शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणामुळे विद्यार्थी अनेक शालेय सुविधान पासुन वंचित-लोकजनशक्ती पार्टी
बीड :अंबाजोगाई . महाराष्ट्र शासनाने शाळा मान्यता देताना विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा असणे आवश्यक असताना अंबाजोगाई तालुक्यात अनेक शाळांमध्ये विविध नियमांची नियमावली दिलेली असताना त्या नियमांचे उल्लंघन करून अनेक मातब्बर व्यक्ती शाळा चालवत आहेत अनेक शाळेमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून त्यांच्या या सर्व असुविधांचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक शाळेच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने तेथे मच्छर उत्पन्न होऊन विद्यार्थी तथा विद्यार्थिनींना डेंगू मलेरिया यासारखे गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता न करता येत नाही तसेच आंबेजोगाई तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करण्यात यावी तसेच प्रामुख्याने गोदावरी बाई कुंकूलोळ कन्या शाळा परळी रोड अंबाजोगाई या शाळेची सखोल तपासणी करून सदर शाळेकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे संबंधित शाळेमध्ये वर्गखोल्या ह्या अत्यंत अस्वच्छ असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसणे मुश्किल झाले आहे सदर शाळेतील वर्गखोल्या मध्ये पंखे नाहीत त्यामुळे विद्यार्थिनींना गर्मीमध्ये तासन तास बसावे लागत आहे सदर शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही त्यामुळे विद्यार्थिनींना पाण्याअभावी राहावे लागत आहे संबंधित शाळेमध्ये अनेक असुविधा असल्याने त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थिनींच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाने शाळा मान्यता देताना जे नियम व अटी लागू केले आहेत तेच नियम व अटी या शाळेने न पाळल्यामुळे संबंधित शाळेवर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन गटशिक्षण अधिकारी गटशिक्षण कार्यालय अंबाजोगाई यांना देण्यात आले यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे युवा मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहूळे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक काळे केज तालुका अध्यक्ष गंगाधर पोळ परळी तालुका अध्यक्ष विशाल शेवाळे अकबर पिंजारी सुमित आवाडे व इतर उपस्थित होते
Comments
Post a Comment