राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सार्वजनिक जयंती बीड शहरात प्रथमच
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सार्वजनिक जयंती बीड शहरात प्रथमच
बीड (प्रतिनिधी) आरक्षणाचे जनक सत्यशोधकिय थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर स्थापन करण्यात आली असून यावर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152 वी जयंती (से.नि. सीईओ) माननीय पी. व्ही. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 जून 2026 शुक्रवार रोजी विविध उपक्रमाने साजरी करण्यात येणार आहे. सकाळी ठीक : 8.30 वाजता मान्यवरांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला तसेच सुशोभित रथातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून समता सैनिकांच्या मानवंदनेने विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. सदरील रॅलीमध्ये आयु.महालिंग निकाळजे जिल्हाध्यक्ष (भारतीय बौद्ध महासभा बीड (पश्चिम), मा.बी.बी. जाधव (सनदी लेखापाल), मा. संदीप उपरे (अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद) प्रा. प्रदीप रोडे (अध्यक्ष नालंदा फाउंडेशन बीड) मा. सुभाष साळवे (जिल्हा कृषी अधिक्षक बीड) मा.सतीश साळुंखे (प्रसिद्ध इतिहास संशोधक, नाटककार बीड) मा. सुरेश साबळे उपाध्यक्ष (सम्राट अशोका से.नि. पोलीस क.-अ. सा. सं. बीड) मा. गणेश सावंत (कार्यकारी संपादक सा. दैनिक रिपोर्टर) मा. धनंजय शेंडगे (जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ) मा. वैभव स्वामी (संपादक दै. समर्थ राजयोग, प्रदेश संपर्कप्रमुख म.रा. पत्रकार संघ मुंबई) मा. प्रकाश कानगावकर (अध्यक्ष ओबीसी 12 बलुतेदार संघटना) मा. अमरसिंह ढाका (संरक्षण सचिव महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभा) मा. रोहिदास बनसोडे (प्रदेश महासचिव तथा प्रवक्ता राष्ट्रीय चर्मकार संघ) मां. गणेश ढवळे (सामाजिक कार्यकर्ते) डॉ. रमेश कैवाडे (जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती संघटना) मा. एस.एम. युसूफ (ज्येष्ठ मुक्त पत्रकार) यांच्या समवेत रॅलीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. रॅली सुरू झाल्यानंतर संत गाडगेबाबा, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून सुभाष रोड मार्गे सारडा संकुल येथील क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी अहिल्यादेवी होळकर तसेच सुभाष रोड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे व नंतर विचार प्रवर्तक सभा होणार आहे. या कार्यक्रमा प्रसंगी सर्वश्री मा. जे.टी. साळवे, मा.उत्तमराव पवार, प्रा. गजानन चित्रे, प्रा. श्रीराम जाधव, प्रा. अंकुश निर्मळ, मा. सुभाष गायकवाड, मा.डी.जी. तांदळे, मा.शेर जमाखान, मा. सुनील दोडके, मा.रामेश्वर पवार, एड. सतीश शिंदे, मा. जगन्नाथ चव्हाण, मा. एम.एम. शेख, मा. अनिल गिरी, मा. संतोष बर्डे, मा. सुनील बळवंते, मा. राम चौधरी, मा पंजाबराव येडे, मा. सुभाष काळे, ह.भ.प.संतोष डोंगरे महाराज, ह.भ.प. श्रीकृष्ण उबाळे महाराज, मा. संगमेश्वर आंदळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रबोधनात्मक सभेनंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता होणार आहे. तरी बीड शहरातील सर्व समाजातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करावे असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर तर्फे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment