अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करा-बीड शहर बचाव मंच
अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करा-बीड शहर बचाव मंच
अतिक्रमण हटाव मोहिमेला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
बीड प्रतिनिधी : बीड शहरातील सर्वच भागांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिक्रमणे व निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे सर्वच नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. वाहतुकीच्या कोंडीला खऱ्या अर्थाने रस्त्यावर अतिक्रमणे करून स्वतःचे उद्योग व्यवसाय चालविणारे लोक जेवढे कारणीभूत आहेत तेवढेच तळमजल्यावर वाहन पार्किंगची सोय दाखवून बांधकाम परवाने मिळवून, प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची कुठलीही वाहन पार्किंगची सोय न करता अवैध पद्धतीने संकुले बांधून त्यासमोर निर्माण केलेली अवैध वाहन पार्किंग आणि वाहतुकीची कोंडी निर्माण करणारी व्यापारी संकुले हेच तेवढेच कारणीभूत व जबाबदार आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतुकीची कोंडी ही शाळकरी मुले,मुली, विद्यार्थी, महिला-भगिनी, जेष्ठ नागरिक व आपण सर्वचजण यांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषद व पोलीस वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने संयुक्त पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. परंतु अतिक्रमण मोहीम राबवत असताना ऐन वेळेला काही तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक समोर येऊन याचा विरोध ही करत आहेत. तसेच याचा विप विपर्यास करून समाज माध्यमां मार्फत चुकीच्या बातम्या-अफवा पसरवण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर पणे करत आहेत. जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण करणे कुठल्यातरी पद्धतीने शहरांमध्ये तणाव निर्माण करणे हाच त्यांचा उद्देश आहे. कुठल्यातरी अमुक एका समुदायाचे आम्हीच तारणहार आहोत असा भासवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून राबविल्या जात असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अडथळा करणाऱ्या अशा समाजकंटक लोकांवर वेळ पडली तर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी बीड शहर बचाव मंचाच्यावतीने नुकतेच सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय अप्पर पोलीस अधीक्षक समीर सर यांना भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तरी बीड शहरातील सर्व सुजाण नागरिक बंधू भगिनींना आपल्या सर्वांच्या सोयीसाठी राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सहयोग करावा असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. यावेळी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने अध्यक्ष नितिनजी जायभाये, मा. प्रा. डी.जी तांदळे सर, मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉ. संजय तांदळे, ज्येष्ठ समाजसेवक सुधीर देशमुख, राष्ट्रवादी पा. सेवादल मा. जि.अध्यक्ष पाशाभाई शेख, पत्रकार कलीम मोमीन, पत्रकार समाजसेवक शाम मार्कंडे, बाजीराव ढाकणे आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment