परळी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर

परळी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर

​कौठळीतांडा 'ना.मा.प्र. महिला', तर वसंतनगर 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी राखीव

​परळी वैजनाथ:बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मुंबई ग्रामपंचायत नियम १९६४ अन्वये परळी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. माननीय तहसीलदार श्री. विनोद रणवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
१२ वर्षांच्या मुलाच्या हस्ते काढण्यात आली चिठ्ठी
​आरक्षण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. परळी येथील १२ वर्षीय लहान मुलगा चि. वैजनाथ किशोर नाईकवाडे याच्या हस्ते आरक्षण सोडतीची पहिली चिठ्ठी काढण्यात आली.
​या चिठ्ठीनुसार खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित झाले आहे:

कौठळीतांडा ग्रामपंचायत: नागरिक मागास प्रवर्ग - ना.मा.प्र. (महिला)
​वसंतनगर ग्रामपंचायत: सर्वसाधारण (महिला)

​या सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाप्रसंगी वसंतनगर आणि कौठळीतांडा या दोन्ही गावांचे आजी-माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ तसेच तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण जाहीर होताच गावागावांत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी