पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवा - बिरसा फायटर्सची मागणी
नंदुरबार प्रतिनिधी :- महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असून इतर सरळसेवा परीक्षांप्रमाणे ही वयोमर्यादा ३३ वर्षे किंवा ३८ वर्षे करण्यात यावी, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत.त्या आंदोलनाला आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत. कोरोना काळातील नुकसान आणि भरती प्रक्रियेतील विलंबाचा हवाला देत ही मागणी जोर धरत आहे.सध्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीवयोमर्यादा किमान वयोमर्यादाः १८ वर्षे व कमाल वयोमर्यादा (खुला प्रवर्ग): २८ वर्षे,राखीव प्रवर्ग (OBC, SC, ST): कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत सूट मिळते.वाढत्या वयामुळे भरती प्रक्रियेपासून वंचित राहणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा देण्यासाठी वयामध्ये शिथिलता मिळावी. तरी महाराष्ट्रात सुद्धा इतर राज्यांच्या धर्तीवर (उदा. मध्य प्रदेश, गुजरात) खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा ३३ ते ३८ वर्षे करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment