कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी चेतना तिडके यांचा सामाजिक संस्थांकडून सन्मान

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी चेतना तिडके यांचा सामाजिक संस्थांकडून सन्मान
बीड प्रतिनिधी : - अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई तथा प्रभारी पोलिस अधीक्षक बीड चेतना तिडके यांच्या कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व लोकाभिमुख प्रशासकीय कार्याचा गौरव म्हणून लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य, मातृभूमी प्रतिष्ठान, बीड आणि महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, महिला सुरक्षिततेबाबत संवेदनशील भूमिका तसेच नागरिकांशी समन्वय साधत प्रभावी प्रशासन उभारण्यासाठी चेतना तिडके यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

सन्मान सोहळ्यास मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे, ज्येष्ठ नागरिक सुधीर देशमुख, किशोर कुलकर्णी, शाम मार्कंडे, शेख पाशा, नितीन जायभाये यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी चेतना तिडके यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, समाज आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

सन्मान स्वीकारताना चेतना तिडके यांनी हा गौरव संपूर्ण पोलिस दलाचा असल्याचे नमूद केले. नागरिकांच्या सहकार्यामुळेच प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखणे शक्य होत असून, समाजहितासाठी पोलीस प्रशासन भविष्यातही तत्परतेने कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी