प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान– आ. सुरेश धस
प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान
– आ. सुरेश धस
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद – महापौर ज्योती गाडे
आष्टी | प्रतिनिधी
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्तींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. ते आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने अहिल्यानगर येथे मेघनंद हॉटेल मध्ये दि २० जून रोजी आयोजित ‘महाराष्ट्र आयकॉन्स’ पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानी भाषणात बोलत होते.
पुढे बोलताना आ धस यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात. त्यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत कार्य करणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात वेळेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, प्रत्येकाने आपल्या कार्यात वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. “आज कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही,” असेही त्यांनी नमूद केले.तर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने गेल्या सात वर्षांपासून सातत्याने नारी सन्मान व आज महाराष्ट्र आयकॉन्स पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वानचा गौरव केला हे युवा पत्रकार संघाचे मोठे कार्य आहे असे त्यांनी सांगितले.
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने राज्यस्तरीय स्तरावर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्याचा घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून समाजाला दिशा देणारा आहे, असे गौरवोद्गार अहिल्यानगर शहराच्या महापौर ज्योती गाडे यांनी व्यक्त केले.या पुरस्कार सोहळ्यामुळे समाजातील गुणी व्यक्तींना योग्य व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळत आहे, असे ही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ सुधा कांकरिया,हभप महंत काशिनाथ महाराज शास्त्री, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा ॲड स्वाती जाधव, नगरसेवक सुरेश बनसोडे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे,बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लालाभाऊ कुमकर,हभप अशोक भोसले,हभप समाधान महाराज, संपादक राजेंद्र होळकर,जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे, उत्तम बोडखे, सुर्यकांत वडकर, संदीप खरमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष जावेद पठाण, सचिव गहिनीनाथ पाचबैल, समीर शेख,सोपान पगारे, अतुल जवणे, प्रेम पवळ, निसार शेख, राजेंद्र लाड, अमोल जगताप, मारुती सत्रे, अतुल जाधव, किरण शिनगिरे, ओंकार कदम, अशोक कुताळ आदी पत्रकार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन राणी दरंदले यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आणि आभार प्रदर्शन समीर शेख यांनी मानले.
"आष्टी तालुका युवा पत्रकार संघ नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवतात. त्यांचे समाजासाठीचे योगदान अतुलनीय आहे.
पत्रकारितेबरोबरच समाजसेवेचा वसा जपणारा युवा पत्रकार संघ - हभप महंत काशिनाथ महाराज
हभप महंत काशिनाथ महाराज शास्त्री बोलताना म्हणाले की,
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे सामाजिक कार्य इतरांनी अनुकरण करण्यासारखे आहे. इतर पत्रकारांनीही अशा प्रकारचे कार्य करावे. पत्रकारितेबरोबरच समाजसेवेचा वसा जपणाऱ्या या संघाचा सर्व स्तरातून गौरव करण्यात आला.
या मान्यवराचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
ह.भ.प. महंत काशीनाथ महाराज शास्त्री — अध्यात्मिक,ह.भ.प. समाधान महाराज नाडकर — अध्यात्मिक,
सौ. सुशिला पवळ व श्री. रमेश पवळ — आदर्श पालक (माता पिता),
सय्यद चाऊस — आदर्श कुस्तीपट्टू (महाराष्ट्र केसरी),
डॉ. मुकुंद विधाते —आदर्श डॉक्टर,
डॉ. संदीप गाडे — आदर्श डॉक्टर,
डॉ. महेश नाथ — आदर्श दंतवैद्य, समाजसेवक, नवउद्योजक
बद्रीनाथ जगताप — आदर्श प्रगतशील शेतकरी,
परिवंत गायकवाड — आदर्श समाजसेवक,
श्री. अमोलक जैन प्रसारक मंडळ — आदर्श शैक्षणिक संस्था,
सागर आमले — आदर्श सरपंच,
गोरख तरटे — आदर्श कृषी अधिकारी,
संतोष दाणी — आदर्श मुख्याध्यापक व समाजसेवक
बाळासाहेब भुकन — आदर्श गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर,
भारती (सावित्री) अनिल शेवते — आदर्श मानद वन्यजीव रक्षक,
श्रीमती सुषमा प्रकाश राठोड — आदर्श उद्योजिका,
भरत गळगटे — आदर्श प्रगतशील पशुपालन शेतकरी,
अशोक सुदाम मुटकुळे — आदर्श युवा उद्योजक,श्री. बाळासाहेब बोडखे — उत्कृष्ट बांधकाम व्यवसायिक,अनिल आंधळे — आदर्श चार्टर्ड अकाउंटंट,
प्रवीण वारे — आदर्श युवा उद्योजक,अॅड. श्री. रत्नदिप निकाळजे — आदर्श विधिज्ञ,
संदीप शिंदे — आदर्श पशुवैद्यकीय अधिकारी, अवित घोलप — आदर्श बांधकाम इंजिनिअर,अशोक कोरडे — आदर्श प्राध्यापक, प्रेमकुमार तावरे — आदर्श मेडिकल युवा उद्योजक, बाबासाहेब पवार — आदर्श समाजसेवक शिक्षक नेता,
सुखदेव पोकळे — दिव्यांग व अनाथालय पीडीतग्रस्त आदर्श संस्था चालक, विजय मेहेर — आदर्श सोने-चांदी उद्योजक, सुभाष चौरे — आदर्श पत्रकारिता,
सूर्यकांत नेटके — आदर्श पत्रकारिता, संतोष आमले — आदर्श संपादक, अजय कापरे — आदर्श समाजसेवक / उद्योजक,
योगेश दाणी — आदर्श रुग्ण समाजसेवक, रवी सातसाई — आदर्श प्राध्यापक, सुधाकर राठोड — आदर्श मुख्याध्यापक,
अॅड. श्री. विकास आजबे — आदर्श युवा विधिज्ञ, भगवान शिनगिरे — आदर्श समाजसेवक, विश्वनाथ राजाभाऊ खेंगरे — आदर्श ग्रामसेवक, शिवराज संजय सोले — उत्कृष्ट सेपाकटकराॅ राष्ट्रीय खेळाडू,शहाजी कोकणे — आदर्श प्रगतशील शेतकरी, अतिक शेख — आदर्श एल.आय.सी. सल्लागार
बबन शिंदे — आदर्श समाजसेवक,
मोहसिन पठाण — आदर्श वाहन विमा सल्लागार, तुषार दिलीप नाथ — उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर
संजय तुपे — आदर्श संगीत अलंकार,प्रीता प्रमोद नागरे — आदर्श बालकलाकार,राणी दरंदले — आदर्श निवेदिका,शहादेव पालवे — आदर्श पोलीस अधिकारी,डॉ. विष्णु साबळे — आदर्श पशुधन विकास अधिकारी,भाऊसाहेब विठ्ठल खाडे — आदर्श युवा उद्योजक,ह.भ.प. अशोक महाराज भोळे — आदर्श वारकरी भूषण या मान्यवरांचा झाला सन्मान
Comments
Post a Comment