बीड जिल्ह्यातील खासगी शाळा व ट्युशन क्लासेसच्या मनमानी फी आकारणीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:- रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष



बीड, दि. २५ जून २०२६ :बीड जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच खासगी ट्युशन क्लासेसकडून विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी प्रवेश शुल्क व फी आकारणीवर नियंत्रण आणून शासनमान्य नियमावली लागू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सविस्तर निवेदन देण्यात आले.

इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात जिल्ह्यातील अनेक शाळा व ट्युशन क्लासेसकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व कष्टकरी कुटुंबांना मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनामध्ये खासगी शाळा व कोचिंग संस्थांची अनिवार्य नोंदणी, शासनमान्य फी संरचना लागू करणे, फीची कमाल मर्यादा निश्चित करणे, सर्व शुल्कांची पारदर्शक माहिती पालकांना देणे, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणे तसेच मनमानी फी आकारणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित विभागीय अधिकारी तसेच महाराष्ट्र शासनातील संबंधित मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, विभागीय शिक्षण उपसंचालक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

यावेळी निवेदन सादर करताना भीमराव कुठे, श्री. हनुमान घोडके (युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष, बीड), हरिदास पवार, प्रवीण अनेराव तसेच इंटकचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंटकच्या वतीने शासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थी व पालकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी