बीड न.प.भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी रि. पा.ई.आठवले गटाच्या वतीने लाक्षणिक उपोषण



 पालकमंत्र्यांनी आंदोलन स्थळी भेट देत कारवाई करण्याचे दिले आदेश

 बीड प्रतिनिधी - बीड नगर परिषदेमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण शहर संघटक सचिव अक्षय कोकाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2022- 23 प्रस्तावित 32 कामे प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे ज्यामध्ये प्रभाग चार मध्ये दोन कोटी 21 लाख 550 रुपयाचा निधी प्राप्त झाला असून सदरील निधी अंतर्गत पाच कामे मंजूर झाले असून एक काम वार्ड क्रमांक 19 मध्ये वळवण्यात आले आहे ते काम एकूण 49 लाख 95 हजार रुपयांचे आहे हे काम अनुसूचित जाती व नवबौद्ध यांची लोकसंख्या 50% किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी किंवा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा प्रभाव अशा शासन नियम असताना देखील हे काम दुसऱ्या प्रभागांमध्ये वळविण्यात आले आहे याच्याच निषेधार्थ 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहर संघटक सचिव अक्षय कोकाटे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक आमरण उपोषण करण्यात आले.


 चौकट

आंदोलन स्थळी पालकमंत्री तथा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य धनंजय मुंडे यांनी भेट देत सदरील कामाची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले* यावेळी शहर संघटक सचिव अक्षय कोकाटे यांच्यासहभारत कांबळे,आप्पासाहेब मिसळे,भैय्यासाहेब वाघमारे,शुभम धन्वे,,सुधाकर डोंगरे,जयभीम वाघमारे,अशोक कोरडे,कपिल ढाकणे,सिध्दार्थ जावळे,सागर धन्वे,कपिल कोकाटे,निलेश गायकवाड, मुन्ना वाघमारे,कृष्णा रणदिवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी