तुलसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाला मोठे पॅकेज मिळवण्याचा करियर मंत्र
एन.आय.टी नागालँड माजी विद्यार्थी इंजिनिअर देवेश कुमार शर्मा यांचे विद्यार्थ्यांना करियर विषयी मार्गदर्शन
बीड(प्रतिनिधी):- कॅम्पस प्लेसमेंट मधून विद्यार्थ्यांनी मोठे पॅकेज कसे मिळवायचे याचा मूलमंत्र एनआयटी नागालँडचे माजी विद्यार्थी इंजिनिअर देवेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना दिला ते ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष करियर मार्गदर्शन शिबिराप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी इंजी. दिपंकर रोडे, उपप्राचार्य डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती.
इंजिनिअर देवेश कुमार शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनात त्यांना ॲमेझॉन मध्ये त्यांना नोकरी कशी लागली आणि ४५ लाखांचे मोठे पॅकेज कसे मिळवले याविषयी सखोल माहिती सांगितली. ते सद्या कोटक ॲट एट इलेव्हन मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहेत. पुढे बोलताना इंजी.शर्मा म्हणाले की, यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा सी.व्ही (बायोडाटा) आहे. विद्यार्थ्यांनी आपला सी.व्ही (बायोडाटा) तयार करताना तो सर्वात चांगला कसा असेल याकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. इंटरव्यू प्रोसेस कशी असते आणि त्यामध्ये किती राऊंड असतात याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. इंजी.शर्मा यांनी मशीन लर्निंग , एआय डेटा सायन्स तसेच विविध वेबसाईट बद्दल माहिती सांगत जॉब साठी कुठे अप्लाय करायचा याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच इंटरव्यू मध्ये विचारले जाणारे विविध प्रशन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या करियर मार्गदर्शन शिबिराच्या शेवटी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून इंजी. देवेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंका दूर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किशोर वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.समीर मिर्झा यांनी मानले. यावेळी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment