सुजल निर्मल गावांन करीता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची गरज. सुधाकर मुंडे.
बीड प्रतिनिधी:-जिल्हा परिषद बीड पाणीपुरवठा स्वच्छता विभाग व मुख्य संसाधन संस्था अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था फत्तेपूर (शिवणगाव) जिल्हा अमरावती त्यांच्या समन्वयाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम पाटोदा येथील पंचायत समिती कार्यालय येथे श्री सुधाकर मुंडे प्रकल्प संचालक पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद बीड तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कवी अशोक मसलेकर लिखित सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर आधारित प्रतिज्ञा देऊन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सुधाकर जी मुंडे म्हणाले की, गाव पातळीवर पर्यावरण व सर्वोत्तम आरोग्यासाठी व्यक्तिगत व सार्वजनिक सांडपाणी व दररोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करून ग्रामपंचायत च्या माध्यमातून व बचत गटाच्या सहकार्याने तंत्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून खत निर्मिती व बायोगॅस सारख्या प्रकल्पातून घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
घराघरातील सांडपाण्याचे शोष खड्डा,परसबाग व स्तरीकरण तळ्यांच्या माध्यमातून पाणी जमिनीत सोडल्यास जमिनीतील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल म्हणून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापना सारख्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवावी असेही त्यांनी यावेळी म्हटले. या प्रशिक्षण कार्यक्रमास पाटोदा तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस, महिला बचत गट,अध्यक्षा जलसुरक्षक यांचे सह समुदाय विकास व क्षमता बांधणी तज्ञ स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत जिल्हा परिषद बीड चे डाॅ.संतोष वाघमारे,संतोष पाबळे अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास संस्था प्रकल्प संचालक,रमेश करपे गटसमन्वयक पंचायत समिती पाटोदा, गोडे एम एन विस्तार अधिकारी, मुकुंद जवकर,रवी बुंदे सहाय्यक प्रशासन अधिकारी, आर्शद शेख, वराट साहेब, प्रवीण प्रशिक्षक डॉ.गणेश खेमाडे, प्रा.विनोद सोनवणे, प्रा.अशोक शेळके, सारावि कार कवी अशोक मसलेकर,सय्यद नय्युम उपस्थित होते.
Comments
Post a Comment