महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी कार्य करावे - प्रो.डॉ.प्रल्हाद लुलेकर
आंबेडकरवादी मिशन नांदेडला दोन लाख रुपयांचा धनादेश ; क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा
बीड(प्रतिनिधी):- महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय समाजात मोठे सामाजिक परिवर्तन घडविले.शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी आपले अध्यापनाचे कार्य करावे,असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्रो.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी केले. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बीड जिल्हा मुप्टा संघटना आयोजित क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, मुप्टाचे संस्थापक सचिव प्रा.सुनिल मगरे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण उपसंचालक छ.संभाजीनगर सुधाकर बनाटे, बीड जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, सिल्लोड शिक्षण संस्थाचे अध्यक्ष जनार्धन मस्के, मुप्टा विभागीय अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी वाघमारे, मुप्टा विभागीय कार्याध्यक्ष प्रा.डॉ.भास्कर टेकाळे, समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाषराव पवळ, प्राचार्य तुपे, धारशिवचे जिल्हध्यक्ष रवी सुरवसे, कळासकर सर, मुप्टा बीड जु.विभाग जिल्हाअध्यक्ष प्रा.शशीकांत जावळे, मुप्टा बीड कार्याध्यक्ष प्रा.राम गायकवाड, मुप्टा बीड जिल्हा सचिव प्रा.राम गव्हाणे, मुप्टा प्रा.विभाग जिल्हाध्यक्ष शरद मगर, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत, बीड मुप्टा मा.विभाग जिल्हाध्यक्ष प्रविण तरकसे, प्रमोद साळवे,प्रा.कोल्ते, प्रा.बाळासाहेब गव्हाणे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आंबेडकरवादी मिशन नांदेडला दोन लाख रुपयांचा धनादेश पाथरी येथील कमल उजगरे, संजय उजगरे यांच्याकडे बीड जिल्हा मुप्टा संघटनेच्या वतीने सुपूर्द करण्यात आला तसेच पुरस्कार प्राप्त पंधरा शिक्षकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा सहकुटुंब सहपरिवार गौरव करण्यात आला आणि याप्रसंगी मुप्टा न्यूज अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना प्रो.डॉ.लुलेकर म्हणाले की, आदर्श शिक्षकांनी महापुरुषांचा वैचारिक वारसा जपत शैक्षणिक कार्य केले पाहिजे. तसेच वंचित उपेक्षितांना न्याय दिला पाहिजे.जात,धर्म,प्रदेश याच्या भिंती तोडून माणूसपण जपले पाहिजे,असे मत व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक सुनील मगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना " मै कल भी सफर मे था, मै आज भी सफर मे हू ,फर्क सिर्फ इतना है कल मे अपनों के तलाश मे था, आज मे खुद की तलाश मे हु हा शेर म्हणत मुप्टा संघटनेच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकत भविष्यातील विविध आव्हाने आणि संघटनेचा लढा याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे यांनी गेली पंधरा वर्षे सातत्यपूर्ण क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडतो असे सांगितले. सदरील आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्रस्ताव न मागवता पुरस्काराची निवड ही शिक्षकाच्या सामाजिक कार्यावरून केली जाते असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच संघटनेने केलेल्या विविध सामाजिक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुप्टा प्रा.वि.जिल्हाध्यक्ष शरद मगर, सूत्रसंचालन प्रो.डॉ. मनोहर सिरसाट यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.राम गायकवाड यांनी मानले.यावेळी बीड जिल्हा मुप्टा संघटना आयोजित
क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Comments
Post a Comment