मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर उमापुरात जल्लोष

मुस्लिम बांधवांकडून पाणी वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.

उमापुर प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शासनाने अध्यादेश जारी केल्यानंतर रविवार सकाळपासून मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला.उमापूर फाटा येथील एकत्रीत येत शंभुराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज की जय ,मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो ,आणि विजयासंबंधी घोषणा देण्यात आल्या.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या १२३ गावांमध्ये उमापुर गावाचा देखील सहभाग होता.तर जरांगे पाटलांच्या आरक्षणासाठीच्या मुंबई पदयात्रेत उमापुरमधील मराठा कार्यकर्ते ही मुंबईत दाखल झाले होते.शनिवारी पहाटे मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर झाल्याचे कळाल्यानंतर उमापुर मध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मुस्लिम समाजाकडून पाणी वाटप

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजाच्या बरोबरीने उमापूर मधील मुस्लिम समाजाने देखील जल्लोष साजरा करत मा.ग्रामपंचायत सदस्य मूबारक भैय्या शेख यांनी उमापूर गावात सर्व समाज बांधवाणां पाणी वाटप करत मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षण अध्यादेशाचे स्वागत केले.मराठा आरक्षणाच्या प्रत्येक आंदोलनात मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे चित्र दिसत असताना आज पुन्हा मराठा आरक्षणाविषयी मुस्लिम बांधवांचा पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान मुंबईहुन परतलेल्या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मराठा समाज बांधवांसह मुस्लिम बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी