सार्वजनिक शिवजयंती उत्सव लिंबागणेश अध्यक्षपदी महावीर वाणी
बीड प्रतिनिधी :- दि.३१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश येथे सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे,सेवा सोसायटी चेअरमन रविबापु निर्मळ, दामुकाका थोरात,अक्षय वाणी, संतोष भोसले, रामदास मुळे, डॉ.गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.नवनिर्वाचित समितीमध्ये अध्यक्षपदी महावीर वाणी, उपाध्यक्ष औदुंबर नाईकवाडे, तुकाराम गायकवाड, सचिव विक्रांत वाणी, दिनेश जाधव, सहसचिव अशोक जाधव, कोषाध्यक्ष संतोष वाणी, सल्लागार अभिजित गायकवाड, सुरेश निर्मळ, दादासाहेब गायकवाड तर सदस्यपदी अमोल गिरे, राजेंद्र थोरात,विवेक बागल,संदिप आवसरे, तुळशीराम पवार,करण वायभट, गहिनीनाथ वाणी, जितेंद्र निर्मळ, सुखदेव वाणी,अख्तर सय्यद, नितीन जाधव,विक्की जाधव,अक्षय ढवळे, हरिओम क्षीरसागर आदिंची निवड करण्यात आली.
प्रास्ताविकात डॉ.गणेश ढवळे यांनी मागील संपूर्ण वर्षभरात शिवजयंती उत्सव समितीकडुन झालेल्या कार्यक्रमांची संक्षिप्त स्वरूपात माहिती देत शिवजयंती उत्सवाची रूपरेषा आणि उत्सवाला अभिप्रेत असणा-या बाबी मांडल्या.यावेळी अध्यक्षपदी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांकडून निवडीचे स्वागत करण्यात आले.
Comments
Post a Comment