जिवाची वाडी येथे संत भगवानबाबा पुण्यनिथी मिमित्त संस्कार महाराज यांचे किर्तन संपन्न.


येवता प्रतिनिधी:दि.२६ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे वैकुंठ वाशी हरिभक्त परायण संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.श्री.संस्कार महाराज खंडागळे,पंढरपूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन हनुमान मंदिरासमोर सकाळी करण्यात आले होते महाराजांनी कीर्तन रुपी सेवेसाठी अभंग ॥याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड होवा आता निश्चितीने पावलो विसावा खुंटलोया धाव तृष्णीचीया कौतुक वाटे झालीत वेताचे नाम मंगळाचे तिन्ही गुणी तुका म्हणे मुक्ती पर्नेयली नोवलीआता दिवसचारी खेळीमेळी ॥अभंगाचे निरूपण केले भगवान बाबांनी समाजासाठी अनेक प्रकारचे प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम केले भगवान बाबांनी गाव गावी कीर्तन करत शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले जमीन विक आपण मुलं शिकवा असा उपदेश घेऊन भगवान बाबांनी समाजाला चांगल्या प्रकारे दिशा देण्याचं काम केले कार्यक्रमास टाळकरी विणेकरी मृदंगाचार्य ग्रामस्थ उपस्थित होते कीर्तनाचे नियोजन जीवाची वाडी ग्रामस्थ व माजी सरपंच महादेव रामकिसन चौरे(पाटील)यांनी कीर्तनाचे सुंदर असे नियोजन केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी