भारतीय राज्यघटनेने कंत्राटी कामगारांना दिलेले अधिकार सनदी अधिकाऱ्यांकडून संपविण्याचा कट : - कामगार नेते श्री आगळे


परळी (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेत कंत्राटी कामगारांना विविध कायद्याद्वारे त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क बहाल केलेले आहेत. ते संपविण्याचा कुटील डाव सध्या सुरू असून याला हाणून पाडण्यासाठी कंत्राटी कामगारांनी एकत्र यावे असे आवाहन कामगार नेते श्री भाई गौतम आगळे सर यांनी केले आहे.
     याबाबत सविस्तर वृत्त असे की कंत्राटी कामगारांना विविध कामगार कायदे व सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून मागील ७ वर्षापासून रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांनी त्यांच्या दालनात बैठकीचा फार्स करून वेळ काढून पणा केला आहे. भारतीय राज्यघटनेचे स्वर्नमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे, तरी सुद्धा कंत्राटी कामगारांना किमान वेतनासाठी लढा द्यावा लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका म्हणावी असे मला वाटते. त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक ०१फेब्रुवारी २०२४ रोजी नवी मुंबई येथील आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचलनालय, सीबीडी बेलापूर कार्यालयासमोर दुपारी एक वाजता कंत्राटी कामगारांचे अधिकार वाचविण्यासाठी घेराव घालून तीव्र निदर्शने आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांची ऑनलाईन बैठक दिनांक ३०जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली. या बैठकीला बीड जिल्ह्यातील सर्व सफाई कामगार व इतर कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी कामगारांना मार्गदर्शन करते वेळी श्री आगळे म्हणाले की बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायत कंत्राटी कामगारांचा अर्ध्यापेक्षा जास्त पगार,कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ई एस आय, घरभाडे भत्ता, दिवाळी बोनस हडप करून बोगस कंत्राटदार व सनदी अधिकारी हे संगणमताने कंत्राटी कामगारांचे शोषण करीत आहेत, त्याच्या निषेधार्थ दिनांक २५ जानेवारी २०२४ ते आजतागायत धरणे आंदोलन सुरू आहे. त्या अगोदर कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी सलग १६ दिवस अन्नत्याग उपोषण केले, तरी सुद्धा न्याय दिला नाही. त्या करीता मा. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई कार्यालया समोर दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी एक वाजता अन्नत्याग साखळी उपोषण सुरू केले. त्याची दखल अद्याप घेतली नाही याचाच अर्थ असा निघतो की जिल्हाधिकारी बीड दीपा मुधोळ - मुंडे सह आयुक्त कार्यालय सुध्दा शोषणाचे समर्थन करुन भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचा केवीलवाना प्रयत्न करत आहेत हे दिसून येते. त्या मुळे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई कार्यालयास घेराव घालून तीव्र निदर्शने करून जाब विचारला जाणार आहे. तरी या आंदोलनात बीड जिल्ह्यातील सर्व सफाई कामगारांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कामगार नेते तथा रोजंदरी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी