रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्युटी पार्लर चालक महिलांचा सन्मान - शेख आयेशा
बीड प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागातील ज्या महिला ब्युटी पार्लर चालवून इतर महिलांचे सौंदर्य अधिक खुलवण्याचा प्रयत्न करतात अशा महिलांचा मान्यवर महिलांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी ज्या ब्युटी पार्लर चालक महिला आहेत अशा महिलांनी 70 30 14 93 22 या नंबर वर संपर्क करून आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन आयोजक आश्रय सेवा केंद्राच्या संस्थापिका पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळी ज्या महिला महिलांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय म्हणून जरी स्वीकार केलेला असला तरी या माध्यमातून त्या महिलांचे सौंदर्य वाढवण्याचे काम आपल्या कल्पकतेने करतात. हे काम देखील म्हणावे तेवढे सोपे नाही. ज्याप्रमाणे मूर्तीला आकार देणे सहज सोपे नाही. परंतु जेव्हा मूर्ती पूर्ण सुंदर रूप घेते तेव्हा त्या मूर्तीला नतमस्तक होऊन मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.अगदी त्याच पद्धतीने मुलींच्या, महिलांच्या कडे असलेले जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्या सौंदर्याला अधिक रूपवान करण्याचे काम ब्युटी पार्लरच्या माध्यमातून ज्या महिला करतात त्या व्यवसाय म्हणून जरी करत असले तरी सुद्धा ही एक मोठी समाजसेवाच अनपेक्षित पणे होत आहे. त्यामुळेच अशा बीड शहर आणि ग्रामीण भागातील महिलांचा यावर्षी सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या सन्मानासाठी प्रशासकीय सेवेत यशस्वी झालेल्या पुरुषांमागील महिला आणि प्रशासकीय सेवेत यशोशिखरावर असलेल्या महिला यांच्या शुभहस्ते या महिलांचा सन्मान हा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर मकर संक्रांतीचे औचित्य साधून तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम देखील करण्यात आला आहे. या कदाचित महाराष्ट्रातील पहिल्या आणि अनोख्या उपक्रमाला सत्कारमूर्ती ब्युटी पार्लर चालक महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या नावाची नोंदणी करून सहभाग द्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सत्कार स्वीकारण्यासाठी रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी दैनिक सूर्योदय आणि दैनिक समर्थ राजयोग कार्यालय, सम्राट चौक, शाहूनगर कॉर्नर, बीड बस स्टँडच्या पाठीमागे या ठिकाणी दुपारी 12.30 वाजता उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ सत्कारमूर्ती ब्युटी पार्लर चालक महिलांनी घ्यावा. सत्कार स्वीकारण्यास इच्छुक असलेल्या ब्युटी पार्लर चालक महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या ब्युटी पार्लरचे नाव, आपले पूर्ण नाव,गाव, तालुका, जिल्हा आणि आपला मोबाईल नंबर हा दिनांक 27 जानेवारी पर्यंत 70 30 14 93 22 या व्हाट्सअप नंबरवर नाव नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे.
चौकट...
ब्युटी पार्लर महिलांसाठी विशेष मार्गदर्शन...
प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर पूनम भालेराव या 28 जानेवारी रोजी ब्युटी पार्लरच्या माध्यमातून ज्या महिला इतर महिलांचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, त्यावेळी समोरच्या महिलेच्या त्वचेने सदरील क्रीम एक्सेप्ट केली नाही. त्याची रिएक्शन झाली किंवा एखाद्या क्रीम मुळे सौंदर्य वाढवण्याच्या ऐवजी विपरीत काही घडले तर अशावेळी त्या ब्युटी पार्लर चालक महिलांनी नेमके काय करावे ? या अवघड समस्येतून त्या महिलेसह आपली देखील योग्य पद्धतीने कशी सुटका करून आरोग्य जपले पाहिजे. यावर अनमोल असे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ब्युटी पार्लर चालक महिलांनी याचा विशेष लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment