गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची गढी ग्रामपंचायतला सदिच्छा भेट
.
गेवराई पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी कांबळे मॅडम यांनी गढी ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली यावेळी सरपंच घोंगडे विष्णूपंत यांनी त्यांचा आदर सत्कार केला. यावेळी कांबळे मॅडम यांनी सरपंच घोंगडे विष्णूपंत यांच्याकडून गावातील विकास कामांचा आढावा घेतला व पुढे कोणत्या कोणती कामे व कशा पद्धतीने करायची या कामांबाबत चर्चा केली. तसेच गढी गांवची पाण्याची समस्या गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करून घोंगडे विष्णूपंत यांनी गावात पाणी सुरू करून घेतले व सध्या गावातील पाण्याची समस्या सोडवली यांबाबत कौतुक करून शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व सांगितले की चांगले काम करा कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणतेही काम असेल तर ते कधीही घेऊन या मी ती सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. यावेळी मा इंजि जोगदंड साहेब मा गायकवाड साहेब गढीचे उपसरपंच राजु पठाण सदस्य अमोल ससाणे, सिरसट श्रीचंद,गहीनीनाथ उगलमुगले, ग्रामपंचायत कर्मचारी नारायण जाधव, मोहसीन पठाण, अण्णा ससाणे, सखाराम पोहेकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment