एपीआय अनमोल केदार पाटोद्याचे नवनिर्वाचीत ठाणेदार
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळ यांची अंमळनेर येथे बदली झाली आसुन त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या कडे पाटोदा पोलीस ठाण्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार हे आपल्या धडाकेबाज कामांच्या माध्यमातून जिते जातील तिथे आपला दबदबा निर्माण करतात सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांचा शांत संयमी वेळे प्रसंगी कठोर भुमिका घेत असल्यामुळे अनमोल केदार यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून आपली ओळख निर्माण केली असल्यामुळे त्यांच्यासमोर पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीवर वचक,चोरींच्या घटना,अवैध धंदे रोखण्याचे कडवे आव्हान नवनिर्वाचीत पाटोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या समोर असणार आहे.
Comments
Post a Comment