रस्तयासाठी निवेदने देऊन देऊन थकली जनता सुशिल पिंगळे करणार आता स्वखर्चातुन रस्ता!

बीड :-बीड शहराअंतर्गत रस्तयांची दुरावस्था ईतकी भिषण आहे कि कधी कधी आम्ही धरतीवर न राहता एखाद्या ग्रहावर रहातो कि काय अशी अवस्था या भागातील नागरींकाची झाली आहे. बीड शहरातील मुख्य रस्ते सोडता  शहरातील अंतर्गत रस्ताचे तिन तेरा नी नवु बारा वाजले आहेत.बीड शहरातील कांरजा टाँवर ते पिंगळे गल्ली ते जुनी भाजी मंडी या रस्तयाची अवस्था तर सगळयात बिकट अशीच आहे कारण हा रस्ता आधीच खुळखळा झालेला होता .पण या रस्तयाचे टेंन्डर काढुन प्रशासनाने पुन्हा या रस्तयावर जेसीबी च्या साहय्याने दगड आणी मुरुमाची चादर अंथरण्यात आली, तेंव्हा  या भागातील नागरीकांना दिलासा वाटला होता कि चला आपण परग्रहावर रहात नाही तर धरतीवरच रहातोय, आणि लवकर हा रस्ता आपल्यासाठी तयार होनार आहे. परंतु याच नागरींकांच्या टँक्सच्या पैशातुन सुरू केलेले हे काम दगडगोटे नी मुरुम टाकून संपविण्यात आले. मग मात्र या भागातील नागरिंकाचा हिरमोड झाला. कामाची सुरुवात केलेला हा रस्ता कुठल्या कारणाने फक्त खोदुन ठेवला आणि दगड गोटे मुरमाने फक्त झाकुन टाकला याची माहिती अनेक निवेदने, अर्ज, करुन देखील मिळाले नाही.रस्ता रस्ता बनवला तर नाहीच परंतु तो उलट खोदकाम करुन मुरुम आणी दगडांनी भरुन टाकला. मात्र या रस्तयामुळे अपघाताची मालीका मात्र येथे सुरू झाली, कारण या भागातून रोज ये जा करणार्या शेकडो मोटारसायकल या रोडवरील दगडांमुळे घसरुन पडल्या आहेत आणी वाहनधारकांना गंभीर अशा जखमा झाल्या आहेत. अनेक नागरीकांच्या हाडाचा खुळखुळा या रस्तयामुळे झाला आहे. या रखडलेल्या रोडमुळे अपघात घडुन कुणाचा पाय मोडला तर कुणाचा हात गळयात पडला, तर कुणाच्या पाठीला गंभीर अश्या इजा झाल्या, येथील नागरीकांनी सरकारी दरबारी हजारो खेटे मारले आणी आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता बनवुन दया हि विनंती केली.परंतु सरकारी प्रशासनाने फक्त आश्वासने देऊन या नागरीकांना मोकळया हाताने परतवण्यात आले. या भागातील निवडुन  दिलेले विद्यमान नगरसेवक महोदय मात्र हम नहीं तुम्हारै और तुम नहीं हमारै या भुमिकेत वावरतांना दिसतात.नगर पालीकेच्या ईलेक्शन वेळी मात्र हेच नगरसेवक नागरिकांच्या पायावर अगदी लोंटांगण घालतांना दिसत होते,पण आजच्या स्थितीला हे  नगरसेवक महोदय आपलं तोंड दाखवायला सुध्दा तयार नाहीत . जेंव्हा रस्ता खोदला गेला तेंव्हा या रस्तयासाठी निधी मंजूर झाल्याशिवाय तेंव्हा ते खोदकाम सुरू झाले का ? मग फक्त रस्ता खोदुन व दगडगोटे, मुरुमाने भरुन हे काम लगेच का बंद केले.? या कामासाठी आलेला निधी कुठे गायब झाला? हे देखील बंद बस्तयातच आहे. परंतु सध्या मात्र कांरजा टाँवर पासून पिंगळे गल्ली मार्ग जुनी भाजी मंडी पर्यंतचा रस्ता म्रुत्युचा सापळा बनु पहात आहे. या भागातील सुशिल पिंगळे आपल्या भागातील या रस्तयावरुन मोटारसायकल वरुन जात असतांना पडले नी त्यांच्या मनगटाचे हाड या अपघातात मोडले. आपणाला झालेल्या या अपघातामुळे त्यांना आपल्या या भागातील सर्व नागरिकांची खरच किव आली कि हे नागरिक रोज या म्रुत्युच्या दाढेतून वाट कशी काढत जगतात? आजपर्यंत या रस्तयावर शेकडो जन कोलमडून पडले असुन त्या अपघातात त्यांना गंभीर ईजा झाल्या आहेत. सुशिल पिंगळे यांनी या रखडलेल्या रस्तयाबाबत पाठपुरावा केला. परंतु गे़डयांची कातडी पांघरूण. पडलेले प्रशासन हु का चु करत नाही हे बघुन, आता स्वतहा सुशिल पिंगळे यांनी स्वखर्चातुन हा रस्ता तयार करण्याचे ठरवले असून. काल दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन त्यांनी प्रत्यक्ष जे.सी.बी आणी ट्रँकर घेऊन येत या भागातील महिला व नागरिकांना बोलावुन घेत या रखडलेल्या रस्तयाच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक, महिला, तरुण ,आणी. समस्त नागरिकांच्या उपस्थितीत केला आहे. सुशिल पिंगळे या तरुणाच्या या कार्यामुळे या भागातील नागरिकांनी आनंद साजरा करुन या रस्तयाच्या कामाच्या शुभारंभा वेळी उपस्थित राहुन समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांना चांगला रस्ता देणे हे सरकारचे काम असून देखील या रस्तयाला सरकारला बनवण्यासाठी मुहूर्त मिळेना. त्यामुळे आत्ता या भागातील तरुण सुशिल भैय्या पिंगळे हे या नागरिंकासाठी पुढे सरसावले असुन .लवकरच या भागातील नागरिकांना चांगला रस्ता आता मिळनार म्हणुन नागरिकांनी सुशिल पिंगळेंचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी