पुरवठा विभागाकडील व वाहतूक कंत्राटदाराकडीलमजूरी साठी गोदाम हमालांचे बेमूदत धरणे आंदोलन.
बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्हयातील शासकीय धान्य गोदामातील हमालांची आनंदाचा शिधा किटची हमाली 1 वर्षा पासूनची मिळावी माहे आक्टोंबर,नोव्हेंबर, डिसेंबरची पुरवठा विभागाची हमाली मिळावी पुरवठा विभागाच्या वाहतूक कंत्राटदाराकडील थेट वाहतूकीत केलेल्या कामाची हमाली माहे नोंव्हेंबर,डिसेंबर ची मिळावी तसेच मालाची आवक जावक एकाच वेळेस होऊ नये गोदामाच्या ठिकाणी नागरी सुविधा असावी व अ(1) व ब-2 व्यतिरिक्त होणार्या कामच्या हमाली मिळावी या व इतर मागण्यासाठी जिल्हयातील गोदामातील गोदाम हमालींनी प्रातनिधीक धरणे आंदोलन राजकुमार घायाळ,शेरजमाखा पठाण,यांच्या नेतृत्वात सुरु केले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ बादाडे यांनी दिली.
धरणे आंदोलनाच्या इतर मागण्या पुढील प्रमाणे,महागाई निर्देशांकाचा फरक देण्याच्या उच्च न्यायालयाचा आदेशाची अंमलबजावणी व्हावी, 2012 ते 2017 या कालावधीतील कमी दिलेला फरक द्यावा गोदामात आवक जावक एकाच वेळेस करण्यात येवू नये शासकीय धान्य गोदामातील थेटवाहतूकीमुळे काम कमी झाले असल्याने ज्या त्या गोदामातील हमालाकडूनच काम करुन घ्यावे या व इतर मागण्यासाठी प्रातनिधीक बेमूदत धरणे आंदोलन जिल्हाधिकारी व बीड माथाडी मंडळाच्या कार्यालया समोर सुरु करतील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला धरणे आंदोलनात सहभागी प्रतिनिधी संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ बादाडे,सुभाष लांडगे ,केज,राम कुकर परळी वैजनाथ ,सुधाकर भास्कर शिरसाळा, मारुती इंगळे शिरूर कासार ,लालासाहेब दोनघहु अंबाजोगाई, वसंत चव्हाण पाटोदा ,विजयकुमार राऊत युसुफ वडगाव ,बाबासाहेब शिंदे आष्टी ,अरुण पवार घाटनांदुर ,इसराइल तलवाडा, महावीर चौसाळा ,गोरख पवार मादळमोही, संतोष भीमराव तुमारे उमापूर ,विलास हातागळे गेवराई ,देविदास हुके माजलगाव ,रवींद्र दिवटे कडा, किसन ढोरमारे बीड शेहर, पांडू काकडे बीड ग्रामीण, शेख जाहीर नेकनूर, राजेंद्र जाधव पिंपळनेर सहभागी झाले
Comments
Post a Comment