बॅनर मुक्तीची कारवाई "इव्हेंट" ठरू नये; पुन्हा बॅनर लागल्यास फौजदारी कारवाई व्हावी:- डॉ.गणेश ढवळे
बीड:- आज बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोलिस प्रशासन आणि नगरपालिका संयुक्त विद्यमाने बॅनरमुक्ती साठी उचलण्यात आलेले पाऊस स्वागतार्ह आहे.मात्र नेहमीप्रमाणे बॅनर हटवण्याची कारवाई "इव्हेंट" ठरू नये . भविष्यात पुन्हा अनाधिकृत बॅनर अथवा होर्डिंग लावण्यात आल्यास संबंधितांवर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करता येतो ही जबाबदारी नगरपालिकेची आहे.मात्र गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनाने एकही फौजदारी स्वरूपाची कारवाई केल्याची नोंद आढळून आली नाही.केवळ कागदी घोडे नाचवुन पथकाची नियुक्ती करण्यात येते आणि दोन चार ठिकाणचे बॅनर काढून बॅनर काढून कारवाई केल्याचे भासले जाते.प्रत्यक्षात कारवाई होतच नाही.
राजकीय पुढाऱ्यांच्या सभा,ईतर कार्यक्रम आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा यामुळे शहरात बॅनर ची गर्दी होते. यासाठी कुठलीही परवानगी घेतली जात नाही .असे असतानाही पालिकेकडुन कारवाई तर दूरच बॅनर हटवण्याची तसदीही घेतली जात नाही . बॅनर लावणाऱ्यां कडून नियम धाब्यावर बसवले जातात .नगरपालिकेचा महसूल बुडत असतानाही याकडे नगरपालिका प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करते .सुंदर शहराचे विद्रुपीकरण होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहते. या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा तसेच अनेक छोट्या अपघातांच्या घटकांनी घडलेल्या आहेत.फौजदारी कारवाई करण्याची मानसिकता नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दाखवली तरच बॅनर मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन गंभीरपणे कारवाई करत असल्याचे दिसून येईल.अन्यथा एक "इव्हेंट"म्हणून याकडे पहावे लागेल. बॅनर मुक्तीसाठी सकारात्मक करणाऱ्या नगरपालिका पोलीस प्रशासनाचे आभार
Comments
Post a Comment