गेवराईत होणाऱ्या ग्रा पं. कर्मचारी महासंघाच्या आमरण उपोषणास उपस्थित राहा क्रॉ सखाराम पोहिकर
गेवराई (प्रतिनिधी )गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण गेवराई येथील पंचायत समिती कार्यालय समोर दिनांक 5 / 2/ 2024 रोजी सकाळी11-00 वाजता आयोजित करण्यात आले आहे या आमरण उपोषण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष काँ सखाराम पोहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण होणार असून या उपोषणामध्ये खालील मागण्या घेऊन हे उपोषण होणार आहे मागण्या खालील प्रमाणे . 1) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत मासिक वेतन त्वरित द्या
2) राहणीमान भत्ता सहित मासिक वेतन द्या आणि आज पर्यंत चा थकित राहणीमान भत्ता त्वरित आजा करा
3) भविष्य निर्वाह निधीची वेतनातून कपात केलेली 8.33% रक्कम अधिक शासन हिस्सा 8.33% रकमेच्या हिशोबाचा तपशील द्या पावत्या द्या आणि पासबुकच्या नोंदी अध्याय करा
4)पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्या
5) आकृतीबंध बाहेरील कर्मचाऱ्यांना सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन द्या
6) सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश द्या
7) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गटबाजीतून सूडबुद्धीने वागणूक देऊ नका
वरील सर्व मागण्याच्या संदर्भात आम्ही दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून आम्ही आपल्या पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून आपल्या महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मकक पातळीवर काही मागण्या प्रलंबित असून बऱ्याच मागण्या शासनमान्य मागण्या जिल्हा तालुका स्तरावर केवळ अंमलबजावणी स्तव प्रलंबित आहेत विशेष म्हणजे वारंवार ही बाब आपल्या निदर्शनास आणून आणि वारंवार पाठ पुरवठा करून सुद्धा त्यास प्रतिसाद मिळत नाही यासंदर्भात शासनाचे जबाबदार अधिकारी म्हणून आपण हस्तक्षेप करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे असे यापूर्वी आपणास सन्मान होण्यासाठी वेळोवेळी बैठकीचे आयोजन करण्याविषयी पत्र काढण्यात आली मात्र प्रत्यक्षात बैठकाच घेतल्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संतप्त भावना निर्माण झाले आहेत तेव्हामहाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दिनांक 29 1 2019 रोजी मा गट विकास अधिकारीपंचायत समिती कार्यालय गेवराई यांना आमरण उपोषण चे निवेदन देण्यात आले आहे माहितीस्तव उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद बीड व पोलीस निरीक्षक साहेब गेवराई पोलीस स्टेशन गेवराई यांना हे आमरण उपोषण चे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर स्वाक्षऱ्या करणारे खालील ग्राम पंचायत कर्मचारी कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर
उपाध्यक्ष शरद मोरे सचिव सय्यद जावेदमासाळ सुदाम वडमारे उद्धव गव्हाणे सातीराम गाडे कल्याण पठाण अकबर दत्ता मोरे अरुण आठवले शिवाजी कोकाट इत्यादी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या निवेदन देऊन प्रसिद्धपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले
Comments
Post a Comment