डॉ योगेश क्षीरसागर यांची खंबीर साथ ; नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी साधला संपूर्ण प्रभागाचा विकास



दोन दशकानंतर अंनत अडचणीवर मात करत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह,चौक ते मातोश्री मंगल कार्यालय पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण


दर्जेदार, प्रशस्त रस्त्यासाठी अतिक्रमण धारक  व राजकीय विरोधकांनी केले प्राणघातक हल्ले
तसबूर देखील डागमगले नाहीत विकास जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 28 जानेवारी
 विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सर्वश्रेष्ठ लोकशाही देत अमूल्य असा मतदानाचा अधिकार प्रत्येक भारतीयास बहाल केला म्हणूनचं विश्वाने आपल्या देशाची लोकशाही मानवी श्रेष्ठत्वाचे प्रतीक मानले आहे.गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत  
लोकप्रितनिधी निवडून देणाऱ्या मतदार राजाच्या सेर्वार्थ लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य येथोचित्त पार पाडणे हे लोकप्रतिनीधीचे आद्य कर्तव्य आहे.याच कर्तव्याची जाणीव ठेवत प्रत्येक सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,नगराध्यक्ष,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,आमदार खासदार,आदी लोकप्रतिनिधीनीं आपले स्तरावरून प्रामाणिक पणे कार्य करत असतात अशाच एका कर्तव्यकठोर नगरसेवकां मूळे गेल्या दोन दशकाची रस्त्याची दैना फिटली आहे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांच्या खंबीर साथीमुळे कार्यतत्पर नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी 
प्रभाग क्र 4 चा परिपूर्ण विकास साधला असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,चौक ते मातोश्री मंगल कार्यालय पर्यंत चा मुख्य वाहतूक असलेला रस्ता दर्जेदार केल्याने गेल्या वीस वर्षांपासून भोगत असलेल्या यातना आता कायमच्या हद्दपार झाल्याने तेथील सर्वसामान्य नागरिकांनातून समाधान व्यक्त केले जात आहे. नगरसेवक ॲड. विकास जोगदंड यांनी दर्जेदार व प्रशस्त रस्ते व्हावे म्हणून रस्ता व नाली वरील केलेले अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतल्यामुळे अतिक्रमण धारकांकडून व राजकीय विरोधकांकडून कट कारस्थान करत प्राण घातक हल्ले देखील केले आहेत तरी देखील नगरसेवक ॲड.विकास जोगदंड हे तसबुर देखील डगमगले नाहीत उलट प्रत्येक संकटाचा सामना करत जोमाने ते कामाला लागले आहेत. 
नगरसेवक विकास जोगदंड यांच्या कार्यकाळात खंडेश्वरी ते 
काळा हनुमान ठाणा ते तुळजाई चौक, काळा हनुमान ठाणा ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, ईदगाह रोड ते नाळवंडी नाका, ते पाण्याची टाकी, तोतला गिरणी ते स्व केशर काकू मार्ग 
आदी प्रमुख रस्ते सह बँक कॉलनी अंतर्गत रस्ते, ए.न.के कॉलनी अंतर्गत रस्ते,तसेच शास्त्री नगर, एकता नगर, बलभीम नगर, आंबेडकर नगर (पूरग्रस्तकॉलनी), नागोबा गल्ली मुख्य व अंतर्गत रस्ते फकीरवाडा,दुबे कॉलनी,रमाई कॉलनी, इत्यादी रस्त्याचे कामे झाली असून रस्ता व नालीचा प्रश्न कायम मार्गी लागला आहे तसेच नागोबा गल्ली येथील महिला व पुरुष सार्वजनिक शौचालय, रमाई कॉलनी येथे महिला व पुरुष सार्वजनिक शौचालय, तोतला गिरणी जवळ सार्वजनिक शौचालय, नागोबा गल्ली येथे व्यायाम शाळेसाठी इमारत बांधून जवळ जवळ 80% प्रभागात विकास कामे झाली आहेत. उर्वरित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक सभागृह दुरुस्ती, नागोबा गल्ली वीर सिद्धनाथ चौक (होळी चौक) ते पत्रकार देवेंद्र ढाका यांचे घरापर्यंत, वीरशैव कॉलनी,कांबळे ते  गवंडर, ते मठापर्यंत रस्ता व नाली, बलभीम नगर,एकता नगर,शास्त्री नगर, पूनम गल्ली मधील अंतर्गत रस्ते व नाली चे 
 कामे पूर्ण करण्यासाठी तसेच संपूर्ण प्रभागात सुमारे 2000 नारळाचे वृक्ष लागवडीसाठी नगरसेवक अँड विकास जोगदंड यांचा प्रशासकीय स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत सुमारे 746 तर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत 695 लाभार्त्यांना घरकुलाचा लाभ देऊन आपला प्रभाग आधुनिक प्रभाग हा संकल्प नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी पूर्ण केला आहे
 नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष  डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अँड विकास जोगदंड यांच्या माध्यमातून विकासाचा रथ अविरत  अखंडितपणे असाच गतिमान राहील हा विश्वास देखील प्रभागातील सुजाण नागरिकांनी व्यक्त केला आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी