पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत शेतकऱ्यांना औषधाचे वाटप
बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील मानकुरवाडी येथे पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत कामधेनु दत्तक योजना ढेकनमोहांतर्गत मानकुरवाडी या गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे साहेब, प्रा. गणोरकर साहेब, जाधव साहेब यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मिनरल मिक्स्चर व जंतनाशक औषध, गोचीड निर्मूलन औषधांचे पूर्ण गावात वाटप करण्यात आले. यांच्यासह काळेगाव हवेली या ठिकाणी ही औषधांचे वाटप करण्यात आले.
डॉ. शिंदे साहेब, प्रा. गणोरकर साहेब, जाधव साहेब, सरपंच माऊली जोगदंड, माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव, ग्रामसेवक तांदळे साहेब, संपादक विनोद शिंदे ग्रामसेवक गंनगे साहेब, परिचार ए. एन. राऊत, संभाजी गोडसे, निखिल शिंदे, प्रशांत निसर्गध, अनिल जाधव, यांच्यासह गावातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment