जि. प. प्राथमीक शाळा कानळद येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न



कूष्णा जाधव
तालुका प्रतिनिधी निफाड

 आज शुक्रवार दिनांक 26 /01/2024 रोजी सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामपालिकेचे ध्वजारोहण सरपंच शांताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामपालिकेचे ध्वजारोहणानंतर जि. प.शाळेच्या प्रांगणात धवजारोहनासाठी सर्व उपस्थित झाले.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत जाधव यांनी ध्वजारोहणाबद्दल सूचना मांडली व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीण पगारे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . ध्वजारोहणानंतर अंगणवाडीचे विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, बालगीत, भावगीत, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,अंधश्रद्धा निर्मूलन यावर आधरित नृत्य सादर केले. त्याचबरोबर छोटा उद्योग व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर विनोदी नाटिका सादर करण्यात आल्या या नाटीकांनी उपस्थितांना खळखळून हसवले .शाळेचे मुख्याध्यापक दिपक मोरे यांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये याबाबत मार्गदर्शन करून जादूचे प्रयोग सादर केले.जादूचे प्रयोग बघून उपस्थित आचंबित झाले.
 तालुकास्तरीय जिल्हा परिषदअध्यक्ष चषक स्पर्धेत इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी समीक्षा गणेश जाधव हिचा धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत जाधव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले 
सदर प्रसंगी , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत जाधव ,सरपंच शांताराम जाधव ,उपाध्यक्ष किरण जाधव ,पोलीस पाटील संजय जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य कृष्णा जाधव , संतोष जाधव, विक्रम जाधव , प्रवीण पगारे, दिनकर जाधव, भागवत पारखे , रामराव मोरे , चांगदेव पारखे , सुनील जाधव , कैलास जाधव , बाबुराव जाधव , सर्जेराव पारखे , दत्तात्रय वाघ ,ग्रामसेवक त्रीभुवन सर,तलाठी मोरे तात्या,अंगणवाडी शिक्षिका गीता जाधव मॅडम,खडांगळे मॅडम,गीता वाघ , सर्व ग्रामस्थ,पालक उपस्थित होते . 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिपक मोरे सर , किरण हासे सर निशा साळवे मॅडम यांनी परिश्रम घेतले. अध्यक्षांच्या संमतीने मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे आभार मानले व चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी