फडणवीस यांच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही म्हणण्यावरून मराठ्यांना आरक्षण भेटलं का नाही हा संशय-डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी /-दस्तर खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाला जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तोपर्यंत कसलाही धक्का लावणार नाही. ओबीसी बांधवांवर कसल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ देणार नाही, ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणालाही घुसू देणार नाही अशी उद्घोषणा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजाला आरक्षण दिले की नाही हा संशय निर्माण होत आहे.सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभर काहीही न खाता पिता केलेलं उपोषण, मराठा बांधवांप्रति असलेल त्यांचं प्रेम,श्रद्धा आणि तीन कोटी मराठा बांधव घेऊन मुंबईकडे कूच करणारे सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश की अपयश हा कळीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी पहाटे तीन वाजता ची बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले अशी उद्घोषणा करून मनोज जरांगे पाटील यांची पहिली सरकारसोबत ची बोलणी आऊट ऑफ कॅमेरा झालेली असून नेमकं त्याच्यातून फलित बाहेर काय पडलं हे महाराष्ट्राच्या तमाम मराठा बांधवांसह सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. त्याचं झालं असं मराठा आरक्षणासंदर्भात अतिशय प्रामाणिकपणे आंदोलन चालवणारे सन्माननीय मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारशी कोणतीही चर्चा अंधारात करत नसल्याचे सर्व जनतेला सर्वश्रुत आहे परंतु मुंबई येथे मुंबईमध्ये मराठा घुसण्याच्यापूर्वीच पहाटे तीन वाजता झालेल्या सरकारसोबत च्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं याविषयी तमाम मराठा बांधवांसह सर्वांनाच आतुरता आहे, कारण सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची मागणी म्हणजे 'सरसकट मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण दिले गेले पाहिजे' या मुख्य मागणीला तोडून "सगेसोयरे" हा शब्द जोडून मराठा बांधवांना आरक्षण देण्याची उद्घोषणा करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व मंत्रिमंडळातील इतर मंत्री घेऊन सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे जाहीर आनंदोत्सव साजरा केला परंतु यातून काही प्रश्न निर्माण होतात. महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यामधील मराठा बांधव ज्यांच्या कोणी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना ह्या अगोदरच आरक्षण मिळालेले आहे आणि संविधानानुसार तसा कायदा महामानव, विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच पारित केलेला आहे मग आत्ताच्या मराठा आरक्षणामध्ये गरीब मराठा समाजाला नेमकं मिळालं काय ? हा प्रश्न निर्माण होत आहे कारण आत्ताच्या सरकारमधील महत्त्वाचे मंत्री मराठा आरक्षणाला विरोध करून ओबीसी मधून मराठा आरक्षण दिलं जाऊ नये असा अट्टा अट्टाहास करत आहेत कारण बीजेपी सरकारची महत्त्वाची वोट बँक म्हणजे ओबीसी समाज आहे आणि फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व असून सत्तेमध्ये असताना ओबीसी बांधवांवर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही,त्यांच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही अशी पत्रकार परिषद घेऊन ठणकावून सांगणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरं आहे का? किंवा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये झालेला तह हा खरा आहे याबद्दल शंका निर्माण होत आहे. गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे हा सर्वसामान्य ओबीसी, एससी, एसटी व मराठा बांधवांचा महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु याला कुठेतरी वेगळं वळण देऊन सरसकट गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं सोडून सगे-सोयऱ्यांना आरक्षण देऊ हा शब्द मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमध्ये जोडून मराठा बांधवांची दिशाभूल तर केली नाही ना? हा समाजातील विचारवंतांनी विचार करण्याचा विषय आहे. कारण कुणबी मराठा बांधवांना आरक्षण हे कायद्यानुसार, संविधानानुसार महामानव बोधिसत्व विश्वरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे.ते यापूर्वीही मिळत होत कुणबी आरक्षण हे पंजोबा आजोबा वडील मुलगा नातू पणतू या सग्या सोयाऱ्याना मिळत होत तेही अगोदरपासूनच मग दोन-तीन महिने आरक्षण चालून 56-57 मराठा क्रांती मोर्चा काढून त्यातून नेमकं काय फलित मिळालं आहे ? हे आताच्या सरकारने सर्व जनतेला अध्यादेश काढून आणि वटहुकूम काढून सांगावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते तथा आरक्षण अभ्यासक माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारी खालापुरीकर यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपली मनोमन इछ्या आहे परंतु आतापर्यंतच्या मराठा नेत्यांनी जी गरीब मराठा बांधवांची फसवणूक केलेली आहे अशी फसवणूक सध्याच्या पण नेत्याकडून होऊ नये अशीपण इच्छा माझी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात फक्त मसुदा तयार करून त्यामध्ये सगेसोयरे हा शब्द जोडून महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षणच कायम आहे त्याच्यात कसलाही बदल न करता फक्त आम्ही केलं हा राजकीय स्वार्थ समोर ठेवून जर येथील राजकीय नेते जनतेची दिशाभूल करत असतील तर हा सरळ सरळ फसवणूक केल्याचा प्रकार असून समाजातील कुशाग्र आणि हुशार मराठा बांधवांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन मराठा आरक्षणामध्ये कसलाही बदल झालेला नसल्याचे आणि नवीन काहीही पदरी पडलं नसल्याचं अभ्यासांती लक्षात येत आहे कारण एखादा कायदा पारित झाला असता त्याचा शासनाकडून वटहुकूम काढला जातो फक्त जीआर काढणं म्हणजे कायदा पारित होणं असं होत नाही. कोणताही कायदा तयार होण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये tत्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं असतं त्याच्यावर कमिटी बसवली जाते.त्या कमिटीचा इम्पेरियल डाटा तयार केला जातो आणि त्या डाटाच्या आधारे सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष चर्चा विनिमय करतात आणि संविधानाच्या चौकटीत बसून त्याचा अध्यादेश काढून नंतर वटहुकूम काढला जातो आणि त्यानंतर तो कायदा पारित होतो मग मराठा आरक्षणासंदर्भात जर तुम्ही नवीन आरक्षण दिलं गेलं असेल तर त्या संदर्भातली विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामधील चर्चा का झाली नाही? तशा प्रकारचा अध्यादेश आणि वटहुकूम का काढला गेला नाही त्याच्यावरती कमिटी बसवून पूर्व पूर्ण एम्पिरिकल डाटा का घेतला गेला नाही? मागासवर्गी विभाग किंवा ओबीसी विभाग यांचाही व जातीनिहाय जनगणनेचा डाटा अजून पर्यंत पूर्ण झाला नाही तोपर्यंतच मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं हे म्हणणं म्हणजे सरासर मराठा बांधवांची फसवणूक केल्यासारख आहे.फक्त मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात पहाटे चर्चा झाली म्हणजे कायदा पारित झाला अस नाही तो फक्त माराठ्यांसोबताचा एका मराठा मुख्यमंत्री यांचा तह होता तो कायदा नव्हता हे लक्षात असू द्या. आतापर्यंत विदर्भामध्ये,पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी कुणबी बांधवांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलं गेलं आहे तेच आरक्षण कायम असून ज्यांच्या मराठा म्हणून नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालेलं नाही, फक्त कुनबी बांधवांना आणि त्यांच्या रक्त नात्यातील लोकांना फक्त आरक्षण मिळालेलं आहे आणि ते यापूर्वीही मिळालेला आहे त्याच्यात कसलाही बदल झालेला नाही हे अभ्यासांती सरळ सरळ लक्षात येत आहे.परंतु राजकीय हेतू समोर ठेवून आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं हा खोडसाळपणा आणि खोटारडेपणा सरकारचा दिसून येत आहे यात शंका नाही त्यामुळे गरीब मराठा बांधवांनी आता विश्वास ठेवायचा तरी कोणावरती? कारण सर्वांनीच फसवणूक केल्याचे उघड उघड लक्षात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमेकांच्या कानामध्ये झालेली कुजबुज लक्षात घेता काहीतरी वेगळच घडलेलं असल्याची परिचीती महाराष्ट्राला येत आहे. आमचा भाऊ गरीब मराठा बांधव आरक्षण मिळेल या हेतूने उघडा नागडा रस्त्यावरती झोपला, स्वतःचा संसार उघड्यावरती ठेवून तो मुंबईकडे कूच करून आला, गरीब मराठा बांधवांना यावेळेस तरी सरसकट मराठा आरक्षण मिळेल हाच विश्वास मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सर्व समाजाला होता परंतु तो विश्वास लयास गेला की काय? असा प्रश्न मनामध्ये तयार होत आहे. समाजातील आरक्षण अभ्यासक कायद्याचे तज्ञ यांनी भावनेच्या भरामध्ये आनंदोत्सव साजरा न करता संविधानिक आणि कायद्यान्वये अभ्यास करून समाजातील इतर मराठा बांधवांना जे घडलं ते उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवून आपल्या समाजाची यापुढेही फसवणूक होणार नाही,दिशाभूल होणार नाही, नेते समाजाला फसवणार नाहीत, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मराठ्यांना फक्त मुंबईत घुसू द्यायचं नाही हे लक्षात ठेवून तात्पुरतं काहीतरी वचन देऊन मराठ्यांना मुंबईहून माघारी पाठवण्याचं पाप ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जनता जनार्दन जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षण मिळणे काळाची गरज असून हा कळीचा मुद्दा राजकीय मुद्दा न बनता समाजातील सर्व बांधवांनी सन्माननीय मुख्यमंत्री आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नवीन मराठा आरक्षणासंदर्भातला वटहुकूम द्यावा अशी मागणी केली गेली पाहिजे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते तथा आरक्षण अभ्यासक माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment