एन.सी.सी. कॅडेट्सना आजपासून रोख रक्कम देणे सुरू - एस.एम.युसूफ़

एन.सी.सी. कॅडेट्सना आजपासून रोख रक्कम देणे सुरू - एस.एम.युसूफ़


विद्यार्थ्यांची अडवणूक व पिळवणूक थांबली


बीड (प्रतिनिधी) - एन.सी.सी. विद्यार्थी कॅडेट्सना एन.सी.सी. कडून भत्ता रूपात देण्यात येणारी रक्कम चेकच्या माध्यमातून देण्यात येत असल्याने गेल्या वेळी एन.सी.सी. कॅडेट्सचे प्रत्येकी ३४९ रुपये बुडाले होते तर यावेळीही ११३० रूपये बुडण्याच्या मार्गावर होते. ही वस्तुस्थिती कळताच मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी माध्यमातून बातमी रूपात हा विषय मांडला. या बातमीची दखल अवघ्या एकाच दिवसात घेण्यात आली. आज दिनांक ३० जानेवारी २०२४ पासून एन.सी.सी. कॅडेट्सना यावेळेसची रक्कम रोख वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अडवणूक व पिळवणूक थांबली आहे.
"एन.सी.सी.चे विद्यार्थी कॅडेट्स मिळालेल्या चेकने बेजार, गेल्या वेळी चेकची रक्कम बुडाली;यावेळीही बुडण्याच्या मार्गावर" या शीर्षकाने बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दिलेले चेक परत घेऊन रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून रोख रक्कम वाटपास सुरुवात केली आहे. यामुळे आता एन.सी.सी.च्या सर्व कॅडेट्स विद्यार्थ्यांना रोख रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यायाने खाते उघडण्यासाठी बँक आणि पोस्टमध्ये हेलपाटे मारण्याची गरज राहिली नाही. तत्पूर्वी एन.सी.सी. कडून शाळेच्या बँक खात्यात आलेल्या रकमेचे एन.सी.सी. कॅडेट्सना चेक दिले गेले होते. ११३० रूपये मूल्याच्या चेकची रक्कम घेण्यासाठी बँक मध्ये विद्यार्थ्यांसह पालकाचे संयुक्त खाते उघडावे लागत होते. यासाठी २००० रुपयांचा खर्च येत होता. तो पालकांना परवडणारा नव्हता. विशेष म्हणजे गेल्या वेळी सुद्धा एन.सी.सी.च्या प्रत्येक कॅडेट्स विद्यार्थ्याला ३४९ रुपयांचा चेक देण्यात आला होता. तोही बँकेत जमा करून घेण्यात न आल्याने गेल्यावेळी एन.सी.सी. कॅडेट्सचे ३४९ रुपये बुडाले होते. यावेळी शाळांकडून देण्यात आलेली ११३० रुपयांच्या चेकची रक्कम ही बुडण्याच्या मार्गावर होती. ही बाब पाहून या प्रकरणी मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी माध्यमातून बातमीद्वारे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेऊन शाळा व्यवस्थापनांनी एन.सी.सी. कॅडेट्सना दिलेले चेक परत घेऊन रोख रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. म्हणून यावर्षी तरी एन.सी.सी. कॅडेट्सची रक्कम पुर्वीप्रमाणे बुडणार नाही व विद्यार्थ्यांची अडवणूक व पिळवणूक थांबल्याने एन.सी.सी. कॅडेट्समधून आभार व्यक्त करण्यात येत आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी