नोकभरती परीक्षेत झालेल्या "पेपरफुटी प्रकरणी मा. न्यायालयाच्या निगराणीखाली "विशेष चौकशी समिती"ची स्थापना करावी:- आम आदमी पार्टी

आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे. पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर "आक्रोश मोर्चा" काढून सरकारचे लक्ष वेधले आहे.

अजित फाटके पाटील, कार्यकारी अध्यक्ष, आप, महाराष्ट्र
 हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही सरकारला देतो आहे.

देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचा आहे.

यासंबंधीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना देण्यात आले.

आम आदमी पार्टीने सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत

१. सदोष "तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा "महाराष्ट्र लोकसेवा आयोग" (MPSC) मार्फत घेतल्या जाव्यात 

२. नोकभरती परीक्षेत झालेल्या "पेपरफुटी"ची चौकशी करण्यासाठी ताबडतोब मा. न्यायालयाच्या निगराणीखाली "विशेष चौकशी समिती"ची स्थापना करून पुढील ४५ दिवसांत समितीला अहवाल सादर करावयास सांगावा 

३. पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. पेपरफुटीतील गुन्हेगारांना "जन्मठेपेची शिक्षा" व रु. १० कोटी इतका कठोर दंड आकारण्याचा कायदा बनवावा.

५. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे.

आम आदमी पार्टीच्या आक्रोश मोर्चात राज्यातील आम आदमी पार्टीचे संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मिडिया प्रमूख चंदन पवार, पदाधिकारी, योगेश कापसे, गिरीश उगले, स्वप्निल घियां, अभिजीत गोसावी, प्रदिप लोखंडे, चंचल सोनवणे, पदमाकर अहिरे, बाळासाहेब बोडके,अमित यादव, आदेश कर्पे, रितेश सोनवणे, यश डांगळे, नुतन कोरडे, विकास पाटील, चंद्रशेखर महानुभव, अमर गांगुर्डे, दिपक सरोदे, अल्ताफ शेख, कलविंदर गरेवाल , राज कुमावत व ईतर कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी