Posts

Showing posts from November, 2023

शेतकरी बांधवानो नुकसानीच्या ऑनलाइन नोंदणी तात्काळ कराव्यात -राहुल चौरे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी अवकाळी पाऊसामुळे कापूस,तुर आणि कांदा इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीच ऑनलाईन तक्रार तात्काळ कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना पाटोदा तालुका प्रमुख राहुल चौरे यांनी केले आहे.सध्या अवकाळी पावसामुळे कापूस,तूर व खरीप कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. प्रशासन माध्यम व सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करीत आहेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केल्या आहेत.काही शेतकऱ्यांना गांभीर्य नाही यामुळे तक्रार केली तरच पीकविमा नुकसान भरपाई मिळेल. यामुळे उद्याच्या दिवस वेळ आहे खरिपाची crop insurance या ॲपव्दारे unseasonal rain या द्वारे ऑनलाईन तक्रार केली तरचं आपल्याला भविष्यात मदत मिळणार आहे,तरी आपल्या गावातील शेतकरी,मित्र,शेती असलेले पाहुणे, यांना या बाबत तात्काळ कळवावे, त्यांना एकरी हजारोंची मदत मिळू शकते यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पीकांचा देखील पिक विमा भरून घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख राहुल चौरे यांनी केले आहे

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतले श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे दर्शन

Image
.बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर:- वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्यात आज दुपारी तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली.याच दरम्यान संत वामनभाऊ च्या समाधीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतल्यानंतर ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी गडाच्या वतीने स्नेह भोजनही स्वीकारले अचानक झालेल्या या प्रदीर्घ भेटीची चर्चा मात्र यावेळी या परिसरात चर्चाचा विषय ठरली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर संघर्ष करणारे ॲड बाळासाहेब आंबेडकर आज दुपारी निवांत दिसलें त्यांनी अचानक बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर दुपारच्या वेळी महंत विठ्ठल महाराज यांच्याशी बंद दाराआड मुक्त संवाद साधला दरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली या संदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी राजकीय सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले एक वर्षावर लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत राजकीय नेते राज्यभराच्या वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांशी चर्चा आणि संवाद साधत आहेत आज गुरुवारी दुपारी बाळासाहेब

कुणबी नोंदी पहाण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पाटोदा तहसील कार्यालयात मिळते हीन वागणूक

Image
 कुणबी नोंदी पहाण्यासाठी गेलेल्या नागरिका कडुन पैशाची मागणी होत असल्यामुळे पाटोदा तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात सीसीटीव्ही कॅमेरा   बसवावात - आण्णा जाधव पाटोदा (प्रतिनिधी ) राज्यात आरक्षणाचा विषय गाजत आसुन राज्यात कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे मराठा समाजातील नागरिक कुणबी नोंदी पहाण्यासाठी शासकीय कार्यालयात सर्वत्र जातात आशेच पाटोदा तहसिल कार्यालयात ही कुणबी नोंदी पहाण्यासाठी मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने जातात यांचाच गैरफायदा पाटोदा तहसील कार्यालयातील कर्मचारी घेत आहेत.पाटोदा तहसील कार्यालयात कुणबी नोंदी पहाण्यासाठी गेलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना पाटोदा तहसील कार्यालयातील अभिलेख विभागातील कर्मचारी हीन वागणूक देत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ह्या गंभीर घेटनेची तात्काळ दखल घेऊन चौकशी करून कारवाई करावी तसेच अभिलेख विभागात तोंड पाहून कारभार होत आहे तसेच जो पैसे देईल त्याचे काम लवकर होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी पाटोदा तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा जाध

गो रक्षकांना त्रास दयाल तर याद राखा ~ मिलिंद एकबोटे

Image
सनातन हिंदू गोरक्षक श्री. मिलिंद एकबोटे यांची पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण गो-शाळेस भेट तहसीलदार पाथर्डी यांच्या समोर मांडल्या व्यथा { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 या बाबत सविस्तर वृत्त असे की नुकतीच मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पुण्याचे सनातन हिंदू गो रक्षक मिलिंद एकबोटे यांनी प्रत्यक्ष येऊनपाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण गो-शाळेस भेट तहसीलदार पाथर्डी यांच्या समोर मांडल्य तहसीलदार यांना निवेदन दिले गाईना जंगलामध्दे चरू द्या कारन हा त्या मुक्या प्राण्यांछा नैसरगिक हक्क आहे ह्या सर्व गाई पोलिस कारवाई मध्ये जप्त करून गो शाळेमध्ये सोडलेल्या आहेत या गाईचे मालक हे न्यायालय असुन त्याचे पालकत्व न्यायालय आणि गोशाळा यांचे संयुक्त आहे जर गावातील काहि लोकांनि स्वार्थपोटी आपल्या मेंढ्यांना चारा शिल्लक राहावाआणि तो गाईने खाऊ नये या कारणामुळे गाईंना गावातील मोकळ्या सरकारी जागेत चराई बंदी करत आहेत तरी स्वतः तहसीलदार पाथर्डी यांनी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांच्यासह गो शाळेत यभेट डेणार आहेत तसेंच वारकरी संप्रदायचे देवगड संस

बोरीसावरगाव येथे जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - रोहन गलांडे पाटील

Image
बोरीसावरगाव येथे जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - रोहन गलांडे पाटील केज तालुक्यातील सकल मराठा समाजाने उपस्थित रहावे केज प्रतिनिधी:- केज तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांना हात जोडून विनंती करण्यात येते की आपण मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्मथनार्थ बोरीसावरगाव येथे आयोजित केलेल्या मराठा सभेला केज तालुक्यातुन लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती मराठा योद्धे रोहन गलांडे पाटील यांनी केली आहे तसेच आपल्या मराठा सभेला गालबोट लागू नये यांची काळजी प्रेत्येकाने घ्यावी. रोहन गलांडे यांनी असे म्हटले आहे की ही आपन सर्वांनी राजकीय मतभेद विसरून या सभेसाठी उपस्थित रहावे तसेच तुम्ही राजकीय सभा असेल किंवा एखाद्या नेत्याची सभा असेल तर उपाशी रहात पन सभेला हजर असतात.परंतु ही मराठा समाजाची आपल्या आरक्षणासाठी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यसाठी आपल्या न्याय हक्कासाठी ही मराठ्यांची सभा आहे तरी बोरीसावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले असून त्या अनुषंगाने त्या निमित्त बोरी सावरगाव ते

कडुदास कांबळे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित

Image
नाशिक ( प्रतिनिधी ) दि. 30 नोव्हेंबर 23       कडूदास कांबळे यांना 29 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4:00 वाजता महाकवी कालीदास कलामंदिर नाशिक येथे आदिवासी विभागाच्या वतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. डॉ. विजयकुमार गावीत साहेब यांच्या हस्ते तसेच आयुक्त मा. नयना गुंडे  (भा.प्र.से.) आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक व अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी  यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम 25001रुपये, सन्मान पत्र, महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासासाठी सवलत कार्ड देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.        एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या प्रशांत बोकडे, सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन)  बी. ए. कदम , आदिवासी विकास निरीक्षक   पि. एल. कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यामधून एकमेव आदिवासी सेवक पुरस्कारार्थी म्हणून कडूदास कांबळे यांची  निवड करण्यात आली.      कडुदास कांबळे गेल्या 30 वर्षापासून आदिवासी समाजासाठी कार्य करीत आहेत. आद

महानगरपालिकेच्या भूखंडावर बांधलेल्या भिंतींना लोखंडी दरवाजे बसवावेत -आम आदमी पार्टीची मागणी

Image
आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मध्ये बडी दर्गा शरीफ येथे पाण्याच्या टाकीजवळ मनपाचा भूखंड असून येथे मनपाने सदर भूखंडाला तटस्थ भिंत बांधून दिलेली आहे परंतु या भूखंडात आजूबाजूचे रहिवाशी सतत कचरा टाकत असतात त्यामुळे समोर असलेल्या सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद सादिक शाह हुसेन यांची दर्गा आहे जिथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात तसेच सदर मनपाच्या भूखंडाला लागून मनपाची शाळा देखील आहे सदर भूखंडावर नेहमी दुर्गंध पसरलेला असतो, त्यामुळे मच्छर व माशांचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे. महानगरपालिकेच्या नाशिक मधील सर्वच भूखंडावर नुसत्या भिंती बांधल्या आहेत, परंतु त्यांना लोखंडी दरवाजे नसल्यामुळे नशा करणारे लोक, गार्डनमध्ये जावून नशा करीत असतात आणि सर्वत्र घाण पसरवीत असतात, या विषयी अनेक वेळा महानगरपलिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देवूनही तेथील भूखंडाची साफसफाई झालेली नाही, तसेच सदर भिंतींना लोखंडी दरवाजे बसून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली होती आणि आजही ती पूर्ण झालेली नाही. आज पुन्हा महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांना स्मरणपत्र

आष्टी तालुक्यातील मौजे चिंचाळा येथे वीज पडून शेतकर्‍यांच्या गायीचा मृत्यू

Image
आष्टी ( प्रतिनिधी --गोरख मोरे ) :  आष्टी तालुक्यातील मौजे चिंचाळा येथे सोमवार दि.२७ /११/२०२३रोजी संध्याकाळी साडेनऊ च्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला . चिंचाळा येथील शेतकरी संदिप रावसाहेब पोकळे यांच्या गायींच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे .आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला , दरम्यान चिंचाळा /देसुर‌ गावात ही विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस चिंचाळा गावातील शेतकरी संदिप रावसाहेब पोकळे यांच्या मुक्त गाय गोठ्यात वीज पडून त्यात त्यांची एक गायीचा मृत्यु झाला दि .२८/११/२०२३ रोजी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला , या प़सगी सरपंच पंडित पोकळे , डॉ अशोक पोकळे, इतर पंच , गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते .

बांधखडक शिक्षणोत्सव' हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल-गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

Image
  पाचदिवसीय शिक्षणोत्सवात दिग्गज कवी /लेखक /वक्ते /उपक्रमशील शिक्षकांचे लाभले मार्गदर्शन--     लेझीम पथक /आनंदनगरी /चित्रप्रदर्शन / सांस्कृतिक कार्यक्रम ठरले लक्ष्यवेधी   बांधखडकसह वनवेवस्ती /चव्हाणवस्ती येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग  आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून जि.प‌.प्रा.शाळा बांधखडक येथे दि.२१ते २५ नोव्हेंबर २०२३ या काळात संपन्न झालेल्या बांधखडक , वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या नायगाव केंद्रातील तीन शाळांचा संयुक्त 'शिक्षणोत्सव' हा सहशालेय उपक्रम यशस्वी व अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरला .  शनिवार दि.२५नोव्हेंबर २०२३ रोजी गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या अध्यक्षतेखाली या शिक्षणोत्सवाचा समारोप झाला .अध्यक्षीय मनोगतात आदरणीय धनवे साहेबांनी तीनही शाळांतील शिक्षक , विद्यार्थी , ग्रामस्थ व विशेषत: बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिला या सर्वांचे भरभरून कौतुक केले . केवळ घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नसून प्रत्येक विद्यार्थ्यातील सूप्त कला , क्रीडा / साहित्यिक मूल

बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट

Image
 पंढरपूरच्या पांडुरंगाला सागवानापासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण. बीड : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यावर संकट येऊ नये म्हणून बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे याने पंढरीच्या विठुरायासाठी सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची विट तयार केली आहे. त्या विटेचे वजन 11 किलो 700 ग्राम आहे. आणि ती विट पंढरीनाथाच्या चरणी अर्पण केली आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यावर येणारे अस्मानी संकट दूर व्हावे पंढरीच्या विठुरायासाठी अनेक वारकरी अनेक भेटवस्तू घेऊन जातात आपल्या आपल्या परीने जे साकडे घालत आहे ते पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त नवस देखील पूर्ण करतात मात्र एका शेतकरी पुत्राने आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अनोखी आणि एक वेगळ्या पद्धतीने विठुरायाच्या चरणी साकडे घातले आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांवरील संकट आणि शेतकऱ्यांची दुरावस्था ही दूर व्हावी आणि सदैव विठुरायांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावे आणि पुन्हा एकदा बळीच राज्य यावर या उदात्त भावनेतून या किसान पुत्राने विठुरायासाठी सागवान निर्मित कोरीव

संविधान दिनानिमित्त ज्ञानसागर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पंचशील नगर येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

Image
 बीड प्रतिनिधी :- ज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड यांच्या वतीने संविधान दिनाच्या औचित्य साधून सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत परिसरातील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला स्पर्धेचे बक्षीस वितरण हे दिनांक 3 डिसेंबर 2023 वार रविवार रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम ट्रॉफी प्रमाणपत्र व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उत्तरेत करण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक गणेश वाघमारे माजी नगरसेवक विनोद मुळूक एडवोकेट बाप्पा ओटी हे उपस्थित राहणार असल्याचे यावेळी संयोजनांकडून सांगण्यात आले आहे. परीक्षक म्हणून प्राध्यापक शरद धनवे समता जोगदंड मिलिंद विद्याघर अजित वाघमारे रमेश दानवे यांनी काम पाहिले.हा कार्यक्रम यशस्विता पार पाडण्यासाठी अध्यक्ष विजय समीर शेख सहसचिव मोहन घोडके यांनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला निधी कमी पडू देणार नाही : भागवत कराड

 शेवगांव (अविनाश देशमुख 9960051755 ) श्रीरामपूर ( बेलापूर ) परळी या रेल्वे मार्गासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नामदार भागवत कराड यांनी नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना दिले रेल्वे प्रवासी प्रकोष्ट महाराष्ट्र भाजपा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा रेल्वे परिषद भरवण्यात आली होती या परिषदेसाठी भागवत कराड भाजपचे महामंत्री संजय केनेकर उपस्थित होते महाराष्ट्रातील अन्य भागातून मराठवाड्यात येणाऱ्या रेल्वे मार्गासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेसाठी नांदेड लातूर परभणी परळी इत्यादी भागातील रेल्वे मार्गासाठी झटणारे पदाधिकारी व जनता उपस्थित होती या परिषदेसाठी नेवासा तालुक्यातून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गासाठी एक शिष्ट मंडळ नेले होते आमदार मुरकुटे यांनी श्रीरामपूर परळी रेल्वे मार्ग संदर्भात संपूर्ण माहिती मंत्री कराड यांना दिली यावर कराड यांनी आमदार मुरकुटे यांना निधीची काळजी करू नका श्रीरामपूर परळी साठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले यावेळी बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचि

परळी शहरातील भीमनगर व साठे नगर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी 1 डिसेंबर पासून सर्वपक्षीय कार्यकर्ते उपोषणास बसणार

Image
                                          परळी प्रतिनिधी --परळी शहरातील भीमनगर व साठे नगर येथील अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी या भागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते 01 डिसेंबर 2023 पासून परळी पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर व साठे नगर येथील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत यासाठी लेखी निवेदन परळी पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन, दि. 14 /10/ 2023 रोजी दिले असता कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्याच्या कारणाने परत दिनांक 2/ 11/ 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांना प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदन देऊनही आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे सदरील अवैद्य धंदे, हातभट्टी दारू विक्री सर्रास परे चालू असून या धंद्यामुळे गोरगरिबाचे संसार उध्वस्त होऊन वाटोळे होत आहे तर दारूच्या आहारी जाऊन युवकांचे जीवन बरबाद होत असल्याकारणाने सदरील अवैद्य धंदे करणारा वर एम.पी.डी.अंतर्गत गुन्हे दाखल करून सदरी

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचेकडे मुस्लिम समाजाच्या शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नांवर मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा

Image
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ - माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली मौलाना आझाद विचार मंचच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्याकडे शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर निवेदन सादर करून व्यापक चर्चा केली.भारतीय संविधान देशाला समर्पित होवून ७४ वर्षे झाली.पण मुस्लिम समाजाला न्याय व समानता देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला.     शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मुस्लिम समाजाची दयनीय स्थिती असून सरकारी व खाजगी नोकरीमध्ये त्याचे प्रतिनिधित्व कमी होत चालले आहे,त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. गोपाल सिंग आयोग,सच्चर समिती,रंगनाथ मिश्रा आयोग आणि डॉ. मेहमूदुर्रहमान समितीच्या शिफारशींचा उल्लेख करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली.    १५ कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी,बार्टी-महाज्योतीप्रमाणे मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च सेंटर ट्रेनिंग सेंटरची स्थापना करावी, मुस्लिमांना शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती द्यावी,त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे अर्थसंकल्पात निधी उपलब्ध क

शासनाने खुंटेफळ साठवन तलाव मंजूर नसताना ? आधी खरेदी घेतलेल्या शेतकर्यांच्या जमिनी परत कराव्यात ?

Image
  अथवा फेरमुल्यांकन करुन न्याय द्यावा ---संभाजीनगर येथे चिफ ईंजिनियर यांच्याकडे प्रदिप थोरवे(आप नेता) यांची मागणी -- आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    छत्रपती संभाजीनगर येथे मा.कार्यकारी संचालक , गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ संभाजीनगर , व विभागीय आयुक्तांची भेट घेवुन बीड जिल्ह्यतील विविध प्रकल्पांबाबत आम आदमी पार्टीचे युवक नेते प्रदिप थोरवे यांनी माहीती घेतली व खुंटेफळ साठवन तलावासारख्या प्रकल्पासाठी शासनानने अत्यल्प दरात खरेदी केलेल्या शेतकंर्याच्या जमीनीचे फेरमुल्यांकन करन्यासंबंधी विभागीय अधिकार्याना निवेदन देवुन विनंती केली , शासनाने त्यावेळी जमीनी खरेदी घेताना भुमी अधिग्रहण कायद्यातील तरतुदीचा अवलंब केलेला नाही ? तरी प्रचलित सन २०१३ चे शासन निर्णयाप्रमाणे शेतकर्यांना त्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा सुधारीत पध्दतीने फेर मुल्यांकन करून फरक असलेला मावेजा मिळावा ? नसता भूमी अधिग्रहण कायदयातील तरतुदीनुसार प्रकल्प विहीत मुदतीत पुर्ण न झाल्यामुळे त्यांच्या जमीनी नियमानुसार परत करण्यात याव्यात ? ज्या शेतकर्यांनी साठवण तलावासाठी २०१३ पुर्वी शासनास जमीनी

देऊळगाव घाट येथील अखंड हरिनाम सप्ताह /महा ज्ञान यज्ञ सोहळ्यास प्रारंभ

Image
तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा -सप्ताह कमिटी आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :    आष्टी तालुक्यातील मौजे देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथे, २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर रोजी, भैरवनाथ जयंती निमित्त अखंड ज्ञानेश्वरी पारायण महा ज्ञान यज्ञ सोहळ्यास प्रारंभ होत असून हा महा ज्ञान यज्ञ सोहळा, भागवत महाराज उंबरेकर यांच्या कृपा आशीर्वाद खाली चालू असून या सप्ताहाचे हे ३५ वे वर्ष आहे . या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत .  या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये ७ दिवस चूल पेटवली जात नाही , या सप्ताहामध्ये मगर महाराज, राऊत महाराज, सातपुते महाराज, कुऱ्हे महाराज ,आठरे महाराज, मोरे महाराज, व भागवत महाराज उंबरेकर, यांचे कीर्तन होणार आहेत .    या ज्ञान यज्ञ महा सप्ताहाचे पारायणाचे नेतृत्व गोवर्धन महाराज ठोंबरे हे करणार असून, काल्याचे किर्तन भागवत महाराज उंबरेकर यांचे होणार आहे , या सप्ताहाच्या महाप्रसादाचे अन्नदाते, इयत्ता दहावी सन २००६ ची बॅच ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट, या मुला मार्फत असून ,भैरवनाथ

कपिलधार आणि डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य भक्ती स्थळाला येणाऱ्या अधिवेशनात निधी देणार - मंत्री दीपक केसरकर, मंत्री धनंजय मुंडे

Image
  समाजसेवेसह यापुढे शिवा संघटना सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून राजसत्तेत सक्रिय होणार - प्रा मनोहर धोंडे  कपिलधार येथे 22 वी शासकीय महापूजा आणि शिवा संघटनेचा 28 वा राज्यव्यापी मेळावा उत्साहात संपन्न  बीड प्रतिनिधी   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी शिवा संघटनेच्या वतीने तीर्थक्षेत्र कपिलधार सह डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्या भक्ती स्थळाच्या विकासाला भरघोस निधी देण्यासंदर्भात त्यांच्या वतीने मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले आहे. आता या मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मी स्वतः आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आम्ही दोघेजण मिळून मुख्यमंत्री आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घालून या विकास कामांना येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजुरी देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करूत.शिवा संघटने समवेत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली बैठकीचे आयोजन केले जाईल अशी जाहीर ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्याच्या व्यासपीठावरून दिली.  बीड पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ती

भा ज पा हटाव देश बचाव जन जागरण यात्रा 5 डिसेंबर रोजी बीड शहरांमध्ये व जाहीर सभेचे आयोजन कॉ नामदेव चव्हाण‌.‌‌

Image
 बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर :- केंद्रीय सत्ता व महाराष्ट्रातील शिंदे व फडणवीस व पवार यांची राजवट दिवसेंदिवस कामगार कर्मचारी विरोधी आथिर्क धोरणांचा अवलंब करीत असल्यामुळे तमाम कष्टकरी जनसमूह आथिर्क अरिष्टात सापडला आहे यांचे दुष्परिण म्हणून शेतकरी शेतमजूर व बेरोजगार युवक सुध्दा प्रचंड आर्थिक आपेष्टा सहन करत आहेत यांच्या विरोधात आरक्षण चे जनक राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमी कोल्हापूर येथून नागपूर येथे डॉक्टर आंबेडकरांच्या दीक्षाभूमी पर्यंत ३५ जिल्ह्यांमध्ये आयटकच्या वतीने जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदरील जागरण यात्रा बीड येथे पाच डिसेंबर 2023 रोजी येणार असून या यात्रेची मिरवणूक संपूर्ण बीड शहरांमध्ये होणार असून तदनंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी दिली आहे यानिमित्त तयारी शुभेच्छा अध्यक्षस्थानी सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब बडे शिक्षक संघटनेचे कॉम्रेड राजकुमार कदम कॉमेडी डीजी तांदळे भाकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड भाऊराव प्रभाळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे आणि स्त्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी दलित नगरसेवक आक्रमक

Image
राखीव प्रभागाचा विकास हेच ध्येय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी दलित नगरसेवक आक्रमक बीड (प्रतिनिधी ) 28 नोव्हेंबर  अनु.जातीच्या लोकसंख्येनुसार राखीव प्रभागात मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये रस्ते,नाल्या वा इतर नागरी सुविधा पुरविणे साठी तसेच विकास कामे करण्यासाठी राज्य शासन नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शहरी भागासाठी नगर परिषदेला निधी उपलब्ध करून दिला जातो तशी तरतूद संविधानाचे शिल्पकार तमाम भारतीयांचे उद्धारकर्ते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या घटकपर्यंत विकासाच्या दृष्टीने संविधानात केली असून आंबेडकरांचे हे उपकार कधी न फिटणारे आहेत  परंतु आज ही प्रशासकीय स्तरावर मागासवर्गीयांच्या वस्त्या विकासापासून कोसो दूर ठेवण्याचं कारस्थान केले जात आहे   सन 2023-24 या वर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत निधी उपलब्ध झाले बाबत मा. मुख्याधिकारी, नगर परिषद बीड यांना जिल्हा प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले असून देखील पत्राच्या अनुषंगाने अद्याप पर्यंत मुख्याधिकारी,बीड तसेच

पुढा-यांची त-हा न्यारी म्हणे शासन आपल्या दारी, दुष्काळी परिस्थितीत कोट्यवधींचा चुराडा:- डॉ.गणेश ढवळे

Image
----- बीड:- बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असताना, बीड जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात २३५ शेतकरी आत्महत्या झालेल्या असताना ज्ञानमंदिरांना अवकळा आलेली असताना त्यांना निधी देताना हात आखडता घेणारे सरकार शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमांवर जाहिरात, बॅनर बाजी करत ५ कोटी पेक्षा जास्तीचा जनतेच्या पैशाचा चुराडा करत असुन जिल्ह्यातील संपादकांची भुसंपादनाची जाहिरातीची देयके अदा करण्यात यावीत यासाठी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात गेल्या ३ वर्षांपासून धरणे आंदोलने करणा-या संपादकांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असुन केवळ आश्वासने देऊन टोलवाटोलवी करत असुन "शासन आपल्या दारी" कार्यक्रम म्हणजे जनसामान्यांची थट्टा असुन यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२८ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, उपमुख्यम

बचत गटाच्या महिलांनी बँकेला पर्याय म्हणून पुढे आले पाहिजे-महादेव जोगदंड

Image
       गेवराई  ( प्रतिनिधी ) दि. 27 - बचत गटांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा आणि गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रचनात्मक पद्धतीने काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन  नवचेतना सर्वांगीण  विकास केंद्र या संस्थेचे कार्यकर्ते  महादेव जोगदंड यांनी तळणेचीवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड येथे महिला बचत गटांच्या बैठकीत व्यक्त केले.       आज दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी तळण्याचीवाडी येथील बचत गटांच्या महिलांची व्यापक बैठक रोहिणी राऊत यांनी आयोजित केली होती. या बैठकीसाठी गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.        यावेळी महादेव जोगदंड यांनी महिला बचत गटाच्या बैठकीमध्ये  गाव पातळीवर रोजगाराच्या संधी कशा शोधायच्या, महिलांनी रोजगार कसे उभा करायचे, उत्पादन केलेल्या मालाची बाजारपेठ कशी शोधायची, बचत गटाच्या माध्यमातून बँकेला पर्याय कसा उभा करायचा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्व विषयावर सखोल मार्गदर्शन केले.         यावेळी उपस्थित महिलांनी स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी आमचा बचत गट सक्षम करू असा आत्मवि

मातृभुमी प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकार महेश बेदरे नानासाहेब डिडुळ सन्मानित.

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) मातृभुमी प्रतिष्ठान यांच्या कङून दरवर्षी शैक्षणिक ,संशोधन, कला -क्रिङा,किर्तन,सांस्कृतिक,शौर्य,योगा, सामाजिक कार्य,प्रशासन, पत्रकारीता ,यु.पी.एस.सी. ,एम. पी .एस .सी. या मध्ये प्राप्त केलेल्या उल्लेखनीय कामगीरीबद्दल गुणवंताचा सन्मापञ देऊन सत्कार करण्यात येतो पत्रकारिता या क्षेत्रात मागील काही वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व व्हॉइस ऑफ मीडियाच्या पाटोदा तालुका कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल पाटोदा येथील पत्रकार महेश बेदरे व ग्रामीणचे पत्रकार नानासाहेब डिडुळ तसेच दैनिक लोकमतचे पाटोदा तालुका प्रतिनिधी संजय सानप यांना मातृभूमी प्रतिष्ठानकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.        2022- 2023 मध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल महेश श्रीरंग बेदरे आणि नानासाहेब मोतीराम डिडुळ यांना मातृभुमी चे अध्यक्ष ङाॅ. संजय तादळे , सचिव प्रा. बाळासाहेब नागरगोजे ,कोषाध्यक्ष पांङूरंग जायभाय यांच्या कङून श्री .क्षेत्र संत मीराबाई (आईसाहेब) संस्थान महासांगवी या ठिकाणी महंत राधाताई महाराज आईसाहेब यांच्या हस्ते सन्मानपञ देऊन गौरव करण्यात आला

भारतातील विविधता एका सूत्रात बांधणारा गुरुमंत्र म्हणजे भारतीय संविधान - भाई गौतम आगळे

Image
परळी (प्रतिनिधी )‌ भारतातील विविधता अनेक भाषा संस्कृती, धर्म, जात,पंथ,वंश, वेगवेगळ्या चालीरीती, रुढी, परंपरा या सर्वांना एका सूत्रात बांधणारा गुरु मंत्र म्हणजे भारतीय संविधान आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर येथे आयोजित भारतीय संविधानाचा ७४ वा संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.          भाई आगळे सर पुढे म्हणाले की सध्याचे केंद्रशासन संविधानाच्या विरुद्ध रोज कृत्य करत आहे संविधानात स्वातंत्र्य समता आणि बंधूत भाव या तीन तत्त्वाच्या आधारावर भारत पुनश्चा निर्माण करण्याचे साधन आहे.‌ परंतु आर.एस.एस. व केंद्रशासन येणाऱ्या लोकसभेत पुन्हा निवडून आले तर ते संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत. जमलेल्या सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जर संविधान बदलण्याची वेळ आली तर त्यांनी आपापल्या पक्षश्रेष्ठीला संविधान वाचवण्याची भूमिका घेण्यासाठी भाग पाडावे व संविधान वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्या बाजूने उभे रहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या

अधीक्षक अभियंता स्वामी यांच्या ढिसाळ नियोजना अभावी विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा फज्जा

Image
परळी प्रतिनिधी . सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई चे अध्यक्ष अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या ढिसाळ नियोजना अभावी शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा अक्षरशः फज्जा उडाला. पालकमंत्री तथा कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या विश्रामगृहाचे उद्घाटन केले.      याविषयी अधिक माहिती अशी की, परळी शहरातील शिवाजी चौका जवळ करोडो रुपये खर्च करून शासकीय विश्रामगृह बांधण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार होते. परंतु काही कारणास्तव नामदार धनंजय मुंडे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या ऐवजी बीडच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ यांच्या हस्ते आज विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले.     या उद्घाटन समारंभास उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, स्वतः अधिक्षक अभियंता गौरीशंकर स्वामी व इतर अभियंता उपस्थित होते. तर समोर कार्यक्रमासाठी ठेवण्यात आलेल्या सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.दहा वीस लोक सोडले तर कार्यक्रमाकडे कार्यकर्ते तसेच बांधकाम

चौसाळा महावितरणचा भोगंळ कारभार थांबवा अन्यथा अधिकारयाच्या तोडांला काळे फासणार-विवेक कुचेकर

Image
चौसाळा परिसरात अपघाताला निमंत्रण,सर्वच रोहित्रांच्या पेट्या उघड्या, वेलींसह झाडा-झुडपांचा वेढा (चौसाळा प्रतिनिधी ) चौसाळा महावितरण कार्यालयाअंतर्गत चौसाळा, हिंगणी (बु), हिंगणी (खुर्द), जेबापिंप्री, पालसिंगण, चांदेगाव, देवीबाभूळगाव, अंजनवती, घारगाव, माळेवाडी, रुईगव्हन, पिंपळगाव, वाढवणा, मानेवाडी, सुलतानपूर, कानडी, गोलंग्री, लोणी घाट आदी सर्वच गावांतील डीपी (रोहित्र) पेट्या गेल्या अनेक वर्षांपासून उघड्या असून, याकडे महावितरणचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे.  अनेक रोहित्रांच्या (डीपी) बॉक्सची झाकणे तुटलेली आहेत, त्यातील बाहेर डोकावणारे वायरिंग, लोंबणाऱ्या वायरी, कित्येक डीपींची झाकणेही उघडीच, काही डीपी तर विजेच्या खांबावरून निखळून खाली जमिनीलगतच आलेल्या आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी वापर असणाऱ्या या रोहित्रांच्या मेंटेनन्सचा म्हणजेच फ्यूज, रोहित्रातील तेल, त्याचे झाकण आदींचा आर्थिक खर्च शेतकरी वर्गणी करून करत आहेत. तसेच अनेक गावांतील लोंबकळणाऱ्या तारा ह्या जीवघेण्या ठरत आहेत. या तारांचे घर्षण होऊन अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घट

संविधान सर्व भारतीय साठी- वरदान आहे प्रा-बबीता गायकवाड

Image
  "वाचाल तर वाचाल" तर्फे संविधान दिन विविध उपक्रम घेऊन उत्साहात साजरा   बीड प्रतिनिधि -भारतीय संविधानाची प्रास्ताविका हे घटना सारा आहे.त्यानुसार संविधान कटे कोरपणे अमाल बजावणी म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकास स्वतंत्रता,समता, बंधुता व न्यायाची शाश्वती होय, म्हणून भारतीय संविधान सर्व यांसाठी वरदान आहे प्रतिपादन प्रा. बबीता गायकवाड यांनी सविधान दिनी केले.महामानव मोफत शिकवणी वर्ग प्रकाश अंबेडकर नगर बीड येथे वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचणाऱ्या तर्फे आयोजित संविधान दिन कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत शिक्षक अधिकारी सखाराम उजगरे लाभले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बबीता गायकवाड. सेवानिवृत्त पीएसआय तानाजी शिंगारे व प्राचार्य सुशील कुमार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिति होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डि.जी. वानखेडे यांनी केले. तर सूत्रसंचालन जीएम भोले यांनी केले. सर्वप्रथम तथागतांच्या प्रतिमेस तर घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. विद्यार्थ

शेवगावची रखडलेली नियोजित पाणीपुरवठा योजना त्वरित { कार्यान्वित } कार्यारंभ करण्यासाठी शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची सर्वपक्षीय बैठक संपन्न

{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहराचे नियोजीत पाणीपुरवठा योजना जून 2023 मध्ये वर्क ऑर्डर निघूनही गेल्या पाच महिन्यापासून रखडली आहे ती त्वरित कार्यान्वित करून डिसेंबर 2024 पूर्वी शेवगावकरांना पाणी कसे मिळेल या संदर्भात समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य प्रेमसुख जाजू यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची आज रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी रखडलेल्या नियोजित शेवगाव पाणीपुरवठा योजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याच्या संदर्भात चर्चा झाली यावेळी शेवगाव शहराचे माजी सरपंच श्री सतीश पाटील लांडे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. जगन्नाथ राठी रोटरीचे सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा भा.ज.पा. महाराष्ट्र राज्याचे सह-चिटणीस अरुण मुंडे माजी उप-नगराध्यक्ष वजीर पठाण सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते कमलेश गांधी शब्बीर शेख कृष्णा ढोरकुले उमर शेख विनोद मोहिते कैलास तिजोरे नितीन दहिवाळकर अंकुश कुसळकर दत्ता फुंदे संतोष लाहोटी यांच्यासह शहरातील प्रमुख सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते उपस्थित होत

जपान तसेच तैवान आयोजित जागतिक ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये सक्षम सानप आणि आर्यन सानप यांची निवड

Image
बीड (प्रतिनिधी ) बालकांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने, सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सारख्या पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांमधील जन्मताच गुणांना संधी निर्माण करून दिली जाते. जागतिक स्तरावरील चेअरमन, इंटरनॅशनल अबॅकस इन्स्टिट्यूट ओसाका जपान, मियाजमा अबॅकस इन्स्टिट्यूट तैवान, तैवान चेंबर्स ऑफ कॉमर्स, ओसाका चेंबर्स ऑफ कॉमर्स, पेन पॅसिफिक अबॅकस पेममा चीन तसेच अबॅकस अकॅडमी आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशन तसेच पनामा म्यानमार अबॅकस असोसिएशन , लर्न इंडिया असोसिएशन यांच्या सहकार्याने व समन्वयाने जानेवारी 2024 जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सक्षम रत्नदीप सानप आणि आर्यन रत्नदीप सानप यांना अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे . सक्षम सानप आणि आर्यन सानप यांनी आत्ताच झालेल्या अबॅकस लेव्हल परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवल्यामुळे पहिल्या पाच मध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळविला आहे. अबॅकस जागतिक स्पर्धेमध्ये जपान चीन साऊ

एका पायाने अधू असलेला ऊसतोड कामगार हप्पा पवार यास मातृभूमी प्रतिष्ठानकडून आर्थिक मदतीचा हात

Image
पाटोदा( प्रतिनिधी ) महा सांगवी शिवारात सध्या धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावचे एका पायाने अधू असलेले ऊसतोड कामगार हप्पा पवार वय वर्ष 50 हे मागील वीस वर्षापासून ट्रकचे चाक पायावरून गेल्याने एक पाय निकामी झाला असताना दुसऱ्या पायावर सलग वीस वर्षापासून ऊस तोडणी चालू आहे. सध्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी शिवारात ऊस तोडणी चालू असून पारधी कुटुंबातील हप्पा पवार पत्नी एक मुलगा दोन मुली असे पाच जणांच्या कुटुंबासह ऊस तोडणी करून कष्ट करत आहेत .सध्या गावाकडे देखील वस्तीवर एका कुडात राहत असून, कोणत्याही शासकीय योजना अद्याप पर्यंत त्यांच्या दारापर्यंत पोहोचलेल्या नाहीत .त्यांचे कुटुंब एका मुकादामाच्या टोळी सोबत पाटोदा परिसरातील एका शेतामध्ये ऊस तोडीचे सध्या काम करत आहेत. गुन्हेगारीचा शिका लागलेल्या पारधी समाजात जन्माला आलेले हप्पा पवार हे कष्ट करून दोन वेळच्या भाकरीत चंद्र शोधत आहेत. परिस्थितीमुळे लहानपणापासूनच शाळेत न जाता अगदी वयाच्या सातव्या वर्षापासून ऊसतोड कामगार असलेल्या आई-वडिलांसोबत त्यांनी ऊस तोडणी साठी कोयता हातात घेऊन ऊस तोडीचे काम सुरू केले आहे. एका वर्षापूर्वी गुजरात मध

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील तरुणाच्या कुटुंबियास शासनाची 10 लाखांची मदत

Image
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धनादेशाचे कुटुंबियांना वितरण...! (बीड प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीतून आत्महत्या केलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली (बा) येथील तरुणाच्या कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने 10 लाखांची मदत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली असून, आज या रकमेच्या धनादेशाचे संबंधित कुटुंबास धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली गावच्या शत्रुघ्न काशीद या मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीतून आत्महत्या केली होती. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक पातळीवर देखील काशीद कुटुंबास आर्थिक मदत केली होती; तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून काशीद कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले.  आज काशीद कुटुंबाला मयत शत्रुघ्न काशीद यांच्या पत्नी सुलोचनाताई यांच्या कडे 10 लाख रुपये मदतीचा धनादेश श्री.मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, बबन भैय्या लोमटे, ऍड.अशोक कवडे, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे आदी उपस्थित होते

आरोग्य व रक्तदान शिबीर यशस्वी करा- सुभाष चौरे. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनी होणार रक्तदान शिबिर

Image
बीड /प्रतिनिधी . मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन येत्या 3 डिसेंबर रोजी असून राज्यभरात या दिवशी सर्वत्र आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर होणार आहे .या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बीड तालुक्यातील पत्रकार बंधूंसाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात हे शिबिर होणार असून या संदर्भात बीड तालुक्यातील जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन संभाजीनगरचे विभागीय समन्वयक सुभाष चौरे यांनी केले. यावेळी चौरे यांनी प्रत्येक सभासदाला या शिबिराबद्दल , त्याचे ठिकाण , वेळे बद्दल माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले .या बैठकीला जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय हंगे जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे ,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत ,तालुका निमंत्रक मंगेश निटूरकर ,तालुका समन्वयक लक्ष्मण नरनाळे ,तालुका अध्यक्ष दत्ता आजबे ,कार्याध्यक्ष शेख रेहान, कोषाध्यक्ष प्रशांत लहूरीकर, सरचिटणीस चंद्रकांत साळुंके आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळांच्या पुनः बांधणी व दुरुस्तीसाठी निधी द्या, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन

Image
---  (बीड प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरावस्था असुन प्राथमिक विभागाच्या कसलीच ईमारत नसलेल्या १०३ शाळांच्या इमारतीसाठी आणि धोकादायक वर्गखोल्यांसाठी मिळुन एकुण ९४ कोटींच्या निधींची आवश्यकता असुन निधीची तरतूद करण्यात यावी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन दिले. प्राथमिक शाळांसाठी ९४.१० कोटी निधीची आवश्यकता --- शिक्षण विभाग अंतर्गत इमारत विरहीत १०३ शाळा असुन प्रत्येक शाळेस २ वर्गखोल्या अशा एकुण २०६ वर्गखोल्यांसाठी प्रतिवर्ग खोली १० लक्ष रुपये प्रमाणे एकुण २०.६० कोटींची आवश्यक आहे. तर धोकादायक वर्गखोल्या ६०० आहेत.त्यासाठी प्रति वर्गखोली १० लक्ष प्रमाणे ६० कोटी व पटसंख्या वाढल्याने आवश्यक असलेल्या १३५ वर्गखोल्यांसाठी प्रतिवर्ग खोली १० लक्ष प्रमाणे १३.५० कोटी निधी असा एकुण शिक्षण विभागास ९४.१० कोटी निधींची आवश्यकता असुन तातडीने निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

हाॅटेल बालाजी बीड येथे मोठ्या उत्साहात आम आदमी पार्टी चा वर्धापन दिन साजरा

Image
आम आदमी पार्टी ला भविष्यातील दिवस चांगले आस्तील-माजी सैनिक अशोक येडे जिल्हाघ्यक्ष आम आदमी पार्टी    आम आदमी पार्टी हि एक सामाजिक चळवळ युवकाणी सहभागी व्हावे*डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ता  बीड येथिल आज हाॅटेल बालाजी सम्राट चौंक येथे मोठ्या ऊस्हात पार पडला आम आदमी पार्टीला स्थापण होऊंन आकरा वर्ष पुर्ण करुन यशस्वी रित्य पार करुन बाराव्या वर्षात पदार्पण केले हा शण आम आदमी पार्टी बीडणे दे खिल प्रमुख पाहुणे च्या उपस्थितत पार पडला या वेळी प्रमुख पाहुणे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ता व अध्यक्ष महनुन माजी सैनिक अशोक येडे जिल्हाघ्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या उपस्थित सर्वे कार्यकर्ता सोबत केक कापुण व प्रमुख अतिथि चे स्वागत करुन करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर याणी संबोधित कले कि आम आदमी पार्टी हि एक सामाजिक व्यवस्था परिवर्तन करणारी चळवळ आहे या मध्ये युवकाणी सहभागी झाले पाहिजे कार्यकत्याचा उत्साह वाढवला व सुभेछा दिल्या तसेच आमचे मित्र शेख़ युनुस सामाजिक कार्यकर्ता या वेळी जिल्हा सचिव रामधन जमाले,शहर अध्यक्ष सैयद सादेक, तालुका अध्यक्ष

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केज येथे संविधान दिन उत्साहात साजरा

Image
 केज - केज येथे दि.२६ रविवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करत राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी केज येथील जय टेलर, दिलीप मस्के, प्रेम हजारे, आनंद शिनगारे,निलेश मस्के, संतोष मस्के, प्रेम मस्के,अभिजीत मस्के, निखिल मस्के, सुमित मस्के, प्रतीक हजारे,अमोल कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख व्यक्तींची भाषणे झाली.  भारत देश सुरक्षित व अखंड राहुन प्रगतीकडे वाटचाल करत असुन देशातील सर्व घटकांतील महिला व नागरीकांना आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय,आधिकार,हक्क आणि संरक्षण कायद्याने संविधानाच्या माध्यमातून दिले असुन हि संविधानाची देण महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केली असुन शक्तिशाली लोकशाही गणराज्य याचे बलस्थान संविधान असुन देश त्याच आधारे चालत असुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या अनेक बाबींचा उल्लेख करताना भारतीय संविधानाचा सर्वच पातळीवर गौरव करण्यात येतो ही बाब भारतीयांसाठी गौरवास्पद असल्या

वाडीवऱ्हे येथे सोम.दि.२७ नोव्हें रोजी होणार राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य सम्मेलन

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - (नवनाथ गायकर यांजकडुन)     इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने सोमवार दि.२७ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता संत साहित्याच्या अभ्यासक व मुक्त पत्रकार डॉ. प्रशांत भरवीरकर यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी प्राप्त लेखक व ज्येष्ठ पत्रकार संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहील.         कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संमेलनाचे हे २४ वे वर्ष आहे तालुक्याच्या तसेच नाशिकच्या विविध भागात या अगोदर साहित्य संमेलन भरवले गेले आहेत. यावर्षी वाडीवऱ्हे येथील इंदुमती लॉन्स, पोलीस स्टेशन रोड येथे सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे संमेलन होणार आहे.         संमेलनाच्या प्रथम सत्राची सुरुवात सकाळी ८.३० वाजता वाडीवऱ्हे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या ग्रंथ दिंडीने होणार आहे तसेच सकाळी ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,  १० वाजता उद्घाटन सोहळा असून यावेळी दीप- प्रज्वलन, प्रतिमा पूजन, पुस्तक प्

लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर अमृतजयंती निमित्ताने 'स्टोरीटेल'ची `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व` ऑडिओबुकद्वारे आदरांजली!

Image
`सुशिं`चं `अस्तित्व` पुन्हा बहरणार! `मिशन गोल्डन कॅटस्` ही श्रोत्यांपुढे उलगडणार!! २७ नोव्हेंबर (सोमवार) रोजी, पुण्यात, `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व`चे ऑडिओबुक प्रकाशन समारंभ!!! सुहास शिरवळकर म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड अजूनही कायम आहे. आजही ते मराठीतील सर्वाधिक वाचले जाणारे तसेच ऐकले जाणारे लेखक आहेत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर,`सुशिं`च्या अमृतजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात दोन आगळ्या उपक्रमांतून ते रसिकांना भेटणार आहेत. सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, `स्टोरीटेल`च्या वतीने राज्यात कादंबरी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची विजेती कादंबरी ठरली आहे ती, रवींद्र भयवाल लिखित `मिशन गोल्डन कॅटस्`. ही कादंबरी तसेच, सुहास शिरवळकर लिखित १९९३ साली लोकप्रभा साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध झालेली ‘अस्तित्व’ ही अप्रकाशित कादंबरी याच कार्यक्रमात `स्टोरीटेल`च्या माध्यमातून ऑडिओ स्वरुपात प्रकाशित होणार आहे