बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट


 पंढरपूरच्या पांडुरंगाला सागवानापासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण.
बीड: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यावर संकट येऊ नये म्हणून बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे याने पंढरीच्या विठुरायासाठी सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची विट तयार केली आहे. त्या विटेचे वजन 11 किलो 700 ग्राम आहे. आणि ती विट पंढरीनाथाच्या चरणी अर्पण केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यावर येणारे अस्मानी संकट दूर व्हावे पंढरीच्या विठुरायासाठी अनेक वारकरी अनेक भेटवस्तू घेऊन जातात आपल्या आपल्या परीने जे साकडे घालत आहे ते पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त नवस देखील पूर्ण करतात मात्र एका शेतकरी पुत्राने आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अनोखी आणि एक वेगळ्या पद्धतीने विठुरायाच्या चरणी साकडे घातले आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांवरील संकट आणि शेतकऱ्यांची दुरावस्था ही दूर व्हावी आणि सदैव विठुरायांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावे आणि पुन्हा एकदा बळीच राज्य यावर या उदात्त भावनेतून या किसान पुत्राने विठुरायासाठी सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची एक वीट तयार केली आणि ही पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अर्पण देखील केली आहे.सध्या मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रभर अनेक शेतकरी दुष्काळी संकटाने कधी ओला दुष्काळात कधी सुखा दुष्काळ कधी अवकाळी तर कधी गारपीट यांनी त्रस्त आहे यात अनेक शेतकऱ्यांनी देखील आत्महत्या केल्या आहेत मात्र हेच संकट दूर होण्यासाठी आणि पुन्हा एकदा बळीच राज्य येण्यासाठी किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी विठुरायाच्या चरणी ही वीट अर्पण केली आहे. शेतकऱ्यांसाठी बळीच राज्य यावं असं साकडं देखील पंढरीनाथाला घातले असे श्रीकांत गदळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे..

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी