जपान तसेच तैवान आयोजित जागतिक ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये सक्षम सानप आणि आर्यन सानप यांची निवड
बीड (प्रतिनिधी) बालकांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने, सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सारख्या पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांमधील जन्मताच गुणांना संधी निर्माण करून दिली जाते. जागतिक स्तरावरील चेअरमन, इंटरनॅशनल अबॅकस इन्स्टिट्यूट ओसाका जपान, मियाजमा अबॅकस इन्स्टिट्यूट तैवान, तैवान चेंबर्स ऑफ कॉमर्स, ओसाका चेंबर्स ऑफ कॉमर्स, पेन पॅसिफिक अबॅकस पेममा चीन तसेच अबॅकस अकॅडमी आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशन तसेच पनामा म्यानमार अबॅकस असोसिएशन , लर्न इंडिया असोसिएशन यांच्या सहकार्याने व समन्वयाने जानेवारी 2024 जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सक्षम रत्नदीप सानप आणि आर्यन रत्नदीप सानप यांना अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे . सक्षम सानप आणि आर्यन सानप यांनी आत्ताच झालेल्या अबॅकस लेव्हल परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवल्यामुळे पहिल्या पाच मध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळविला आहे. अबॅकस जागतिक स्पर्धेमध्ये जपान चीन साऊथ कोरिया तैवान, भारत, श्रीलंका, सौदी अरेबिया, इराण, नॉर्वे, यु एस ए, मोरोक्को, सिंगापूर, मलेशिया, साऊथ आफ्रिका, कॅलिफोर्निया, नेपाळ, अशा एकूण बावीस देशांमधील सात हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला असून बक्षीस वितरण कार्यक्रम सुद्धा फेसबूक, ट्विटर, यूट्यूब, झूम अशा सर्व चॅनल्सवर प्रसारित करण्यात येणार आहे . जागतिक अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये आर्यन सानप आणि सक्षम सानप दोघांना बीडच्या सुपर जिनियस अबॅकस विद्यार्थी म्हणून सहभाग घेऊन नक्कीच उत्कृष्ट विजयी पदक मिळतील. अबॅकस लेव्हलच्या परीक्षामध्ये देशस्तरावरील अतिशय प्रतिष्ठित समजले जाणारी अबॅकस प्रवेश परीक्षामध्ये सुद्धा त्यांना सर्वोत्कृष्ट रँकर्स म्हणतात कारण सक्षम सानप आणि आर्यन सानपने अतिशय कठीण गणितीय प्रश्न सोडविण्याचा ऐतिहासिक विक्रम केलेला आहे. आई-वडिलांच्या आणि शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त करता आलेले आहे असे सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशनचे आयोजकने सक्षम आणि आर्यनने मिळवलेल्या यशाचे अभिनंदन केले आहे. अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए. अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून सक्षम सानप आणि आर्यन सानपचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. जागतिक स्तरावरील अबॅकस चॅम्पियनशिपसाठी समाजातील सर्व नातेवाईकांनी मित्रांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांचा विकास करण्यासाठी अबॅकस पध्दत फार उपयुक्त असून शालेय स्तरातील अभ्यासाला मुळातून मदत करण्याची, विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताबद्दलची भीती दूर करण्यासाठी अबॅकस उपयुक्त आहे असे अबॅकस मास्टर ट्रेनर एस. ए. घोडके यांनी सांगितले.
Comments
Post a Comment