आरोग्य व रक्तदान शिबीर यशस्वी करा- सुभाष चौरे. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनी होणार रक्तदान शिबिर



बीड /प्रतिनिधी. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन येत्या 3 डिसेंबर रोजी असून राज्यभरात या दिवशी सर्वत्र आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर होणार आहे .या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बीड तालुक्यातील पत्रकार बंधूंसाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात हे शिबिर होणार असून या संदर्भात बीड तालुक्यातील जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन संभाजीनगरचे विभागीय समन्वयक सुभाष चौरे यांनी केले. यावेळी चौरे यांनी प्रत्येक सभासदाला या शिबिराबद्दल , त्याचे ठिकाण , वेळे बद्दल माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले .या बैठकीला जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय हंगे जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे ,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत ,तालुका निमंत्रक मंगेश निटूरकर ,तालुका समन्वयक लक्ष्मण नरनाळे ,तालुका अध्यक्ष दत्ता आजबे ,कार्याध्यक्ष शेख रेहान, कोषाध्यक्ष प्रशांत लहूरीकर, सरचिटणीस चंद्रकांत साळुंके आदी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी