वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केज येथे संविधान दिन उत्साहात साजरा
केज - केज येथे दि.२६ रविवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करत राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी केज येथील जय टेलर, दिलीप मस्के, प्रेम हजारे, आनंद शिनगारे,निलेश मस्के, संतोष मस्के, प्रेम मस्के,अभिजीत मस्के, निखिल मस्के, सुमित मस्के, प्रतीक हजारे,अमोल कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख व्यक्तींची भाषणे झाली.
भारत देश सुरक्षित व अखंड राहुन प्रगतीकडे वाटचाल करत असुन देशातील सर्व घटकांतील महिला व नागरीकांना आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय,आधिकार,हक्क आणि संरक्षण कायद्याने संविधानाच्या माध्यमातून दिले असुन हि संविधानाची देण महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केली असुन शक्तिशाली लोकशाही गणराज्य याचे बलस्थान संविधान असुन देश त्याच आधारे चालत असुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या अनेक बाबींचा उल्लेख करताना भारतीय संविधानाचा सर्वच पातळीवर गौरव करण्यात येतो ही बाब भारतीयांसाठी गौरवास्पद असल्याचे नमुद केले या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
Comments
Post a Comment