संविधान सर्व भारतीय साठी- वरदान आहे प्रा-बबीता गायकवाड
  "वाचाल तर वाचाल" तर्फे  संविधान दिन विविध उपक्रम घेऊन उत्साहात साजरा 
 बीड प्रतिनिधि -भारतीय संविधानाची प्रास्ताविका हे घटना सारा आहे.त्यानुसार संविधान कटे कोरपणे अमाल बजावणी  म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकास स्वतंत्रता,समता, बंधुता व न्यायाची शाश्वती होय, म्हणून भारतीय संविधान सर्व यांसाठी  वरदान  आहे प्रतिपादन  प्रा. बबीता गायकवाड यांनी सविधान दिनी केले.महामानव मोफत शिकवणी वर्ग  प्रकाश अंबेडकर नगर बीड येथे वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचणाऱ्या तर्फे आयोजित  संविधान दिन कार्यक्रम प्रसंगी  सेवानिवृत शिक्षक अधिकारी सखाराम उजगरे लाभले होते, तर  प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बबीता  गायकवाड. सेवानिवृत्त पीएसआय तानाजी शिंगारे व प्राचार्य सुशील कुमार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिति होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डि.जी. वानखेडे यांनी केले. तर सूत्रसंचालन जीएम भोले यांनी केले. सर्वप्रथम तथागतांच्या प्रतिमेस तर घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  हस्ते  पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. विद्यार्थी व पालकांशी हितगुज साधताना प्रश्न उत्तराच्या रूपात प्रास्ताविकाच्या साराबद्दल प्रा. गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रम प्रसंगी अनन्या वाघमारे भूमिका चौगुले,अमृता चौगुले, आदित्य डोंगरे ह्या विद्यार्थीनी सुरेल आवाजात घटनेबद्दल गित्तगाऊन, सरवाना मंत्रमुग्ध केले.वाचाल तर वाचाल वाचनालयातील विद्यार्थी जास्तीत जास्त पुस्तके वाचणारा विद्यार्थी  आदित्य डोंगरे याला राष्ट्रीचे निर्माते  महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुले, पेरियार रामास्वामी ,डॉ. पंजाबराव देशमुख, संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व जीवन कार्य पुस्तक के देऊन सत्कार करण्यात आला व प्रकाश अंबेडकर नगर परिसरातील  विद्यार्थी व पालका करीता सहाव्या फेरीतीलतिल पन्नास पुस्तक का संच वचान्याकरता शिक्षाका विशाखा वाघमारे यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. पन्नास विद्यार्थ्यांना वाचनालया तर्फे  शालेय  साहित्य वही पेन व प्रस्तावित प्रतिचे करण्यात आले. तर प्राचार्य सुशील गायकवाड यानी  आपल्या वडिलांच्या स्मृती तीर्थ 50 विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे अवगत व्हावे म्हणून इंग्रजी ग्रामर ची पुस्तके त्वरित केली. 
संविधान दिनी तानाजी सिंगारे यांनी स्पष्ट केले की कोणतीही सरकारी नोकरी करताना घटनेनुसार आपले कर्तव्य बजावल्यास जीवनात यशस्वी होता येते.
 घटना समजुन घेणे प्रतेकाचे कर्तव्य आहे. प्रा अर्जुन जंजाळ यानी श्रीलंका धाम यात्रीतील प्रसंग सांगुन स्वतंत्रता, समता, बंधुता, प्रज्ञा, शिल, करुणा व  मैत्री या आधारित आपल्या घटानेचे महत्व सांगीतले, श्रीलंका धाम यात्रा संपन्न  केल्या बद्दल मोफत शिकवणी वर्गातर्फे जि.एम.भेले,व प्रा. अर्जुन जंजाळ ता येथे सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात  शिक्षण व वाचनाची गोडी संविधानाचे  महत्त्व  माननीय सखाराम उजगरे यांनी समजावून सांगितले.
 कार्यक्रमाचे आभार जगदीश वाघमारे यांनी केले. कार्यक्रमस बीड़ी तांगडे, सुबोध गायकवाड, डी.एम. रावत, बि.जी. दळवी, गुलाबराव कस्बे अश्विनी डोंगरे, अर्चना कस्बे अलका जावळे, किसणाबाई जाधव,सहजाबाई चक्रे,आलंका जावळे, व पालक व विद्यार्थी उपस्थित होती,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शरणात येणे कार्यक्रमाची सांगता झाली
Comments
Post a Comment