मातृभुमी प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकार महेश बेदरे नानासाहेब डिडुळ सन्मानित.
पाटोदा (प्रतिनिधी ) मातृभुमी प्रतिष्ठान यांच्या कङून दरवर्षी शैक्षणिक ,संशोधन, कला -क्रिङा,किर्तन,सांस्कृतिक,शौर्य,योगा, सामाजिक कार्य,प्रशासन, पत्रकारीता ,यु.पी.एस.सी. ,एम. पी .एस .सी. या मध्ये प्राप्त केलेल्या उल्लेखनीय कामगीरीबद्दल गुणवंताचा सन्मापञ देऊन सत्कार करण्यात येतो पत्रकारिता या क्षेत्रात मागील काही वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व व्हॉइस ऑफ मीडियाच्या पाटोदा तालुका कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल पाटोदा येथील पत्रकार महेश बेदरे व ग्रामीणचे पत्रकार नानासाहेब डिडुळ तसेच दैनिक लोकमतचे पाटोदा तालुका प्रतिनिधी संजय सानप यांना मातृभूमी प्रतिष्ठानकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
2022- 2023 मध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल महेश श्रीरंग बेदरे आणि नानासाहेब मोतीराम डिडुळ यांना मातृभुमी चे अध्यक्ष ङाॅ. संजय तादळे , सचिव प्रा. बाळासाहेब नागरगोजे ,कोषाध्यक्ष पांङूरंग जायभाय यांच्या कङून श्री .क्षेत्र संत मीराबाई (आईसाहेब) संस्थान महासांगवी या ठिकाणी महंत राधाताई महाराज आईसाहेब यांच्या हस्ते सन्मानपञ देऊन गौरव करण्यात आला . याप्रसंगी समाजसेवक संतोष गर्जे, स्वामी सानप , प्रा.आशोक नागरगोजे ,हौसराव सगळे हे उपस्थित होते .
Comments
Post a Comment