बचत गटाच्या महिलांनी बँकेला पर्याय म्हणून पुढे आले पाहिजे-महादेव जोगदंड



       गेवराई  ( प्रतिनिधी ) दि. 27 - बचत गटांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा आणि गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रचनात्मक पद्धतीने काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन  नवचेतना सर्वांगीण  विकास केंद्र या संस्थेचे कार्यकर्ते  महादेव जोगदंड यांनी तळणेचीवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड येथे महिला बचत गटांच्या बैठकीत व्यक्त केले.
      आज दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी तळण्याचीवाडी येथील बचत गटांच्या महिलांची व्यापक बैठक रोहिणी राऊत यांनी आयोजित केली होती. या बैठकीसाठी गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
       यावेळी महादेव जोगदंड यांनी महिला बचत गटाच्या बैठकीमध्ये  गाव पातळीवर रोजगाराच्या संधी कशा शोधायच्या, महिलांनी रोजगार कसे उभा करायचे, उत्पादन केलेल्या मालाची बाजारपेठ कशी शोधायची, बचत गटाच्या माध्यमातून बँकेला पर्याय कसा उभा करायचा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्व विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
        यावेळी उपस्थित महिलांनी स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी आमचा बचत गट सक्षम करू असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला. या बैठकीसाठी गावातीलविनायक महिला बचत गटाच्या अध्यक्ष राणी अंकुश शिंदे, सचिव दुर्गा प्रभाकर लाड, साईराम महिला बचत गटाच्या अध्यक्ष फरजाणा मोसीम शेख, सचिव मिरा राजेंद्र नवपुते, रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्ष पल्लवीताई भोसले, सचिव लताताई धस, सुगंधा महिला बचत गटाच्या अध्यक्ष अनिता धस, सचिव गीता धस यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
       या बैठकीचे प्रास्ताविक आणि आभार रोहिणी राऊत यांनी केले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी