शेवगावची रखडलेली नियोजित पाणीपुरवठा योजना त्वरित { कार्यान्वित } कार्यारंभ करण्यासाठी शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची सर्वपक्षीय बैठक संपन्न



{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहराचे नियोजीत पाणीपुरवठा योजना जून 2023 मध्ये वर्क ऑर्डर निघूनही गेल्या पाच महिन्यापासून रखडली आहे ती त्वरित कार्यान्वित करून डिसेंबर 2024 पूर्वी शेवगावकरांना पाणी कसे मिळेल या संदर्भात समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य प्रेमसुख जाजू यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची आज रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी रखडलेल्या नियोजित शेवगाव पाणीपुरवठा योजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याच्या संदर्भात चर्चा झाली यावेळी शेवगाव शहराचे माजी सरपंच श्री सतीश पाटील लांडे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. जगन्नाथ राठी रोटरीचे सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा भा.ज.पा. महाराष्ट्र राज्याचे सह-चिटणीस अरुण मुंडे माजी उप-नगराध्यक्ष वजीर पठाण सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते कमलेश गांधी शब्बीर शेख कृष्णा ढोरकुले उमर शेख विनोद मोहिते कैलास तिजोरे नितीन दहिवाळकर अंकुश कुसळकर दत्ता फुंदे संतोष लाहोटी यांच्यासह शहरातील प्रमुख सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते

ताजा कलम

 सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून शेवगाव शहराची भळभळती जखम गंभीर पाणी प्रश्न रखडलेली नियोजित पाणी पुरवठा योजना वर्क ऑर्डर निघून 05 महिने झाले तरी काम सुरू होईना नियोजित टेंडर प्रक्रियाप्रमाणे डिसेंबर 2024 पर्यंत ही योजना कार्यान्वित होण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल करून रखडलेली पाणी योजना त्वरित सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत उपोषण गाव बंद रास्ता रोको आधी आंदोलन करण्याचा निर्णय झाला

{ क्रमशः}

उर्वरित पक्ष त्यांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा चर्चा करणार ~ सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी