मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील तरुणाच्या कुटुंबियास शासनाची 10 लाखांची मदत
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धनादेशाचे कुटुंबियांना वितरण...!
(बीड प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीतून आत्महत्या केलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली (बा) येथील तरुणाच्या कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने 10 लाखांची मदत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली असून, आज या रकमेच्या धनादेशाचे संबंधित कुटुंबास धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली गावच्या शत्रुघ्न काशीद या मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीतून आत्महत्या केली होती. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक पातळीवर देखील काशीद कुटुंबास आर्थिक मदत केली होती; तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून काशीद कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले.
आज काशीद कुटुंबाला मयत शत्रुघ्न काशीद यांच्या पत्नी सुलोचनाताई यांच्या कडे 10 लाख रुपये मदतीचा धनादेश श्री.मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, बबन भैय्या लोमटे, ऍड.अशोक कवडे, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment