कपिलधार आणि डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य भक्ती स्थळाला येणाऱ्या अधिवेशनात निधी देणार - मंत्री दीपक केसरकर, मंत्री धनंजय मुंडे
समाजसेवेसह यापुढे शिवा संघटना सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून राजसत्तेत सक्रिय होणार - प्रा मनोहर धोंडे
कपिलधार येथे 22 वी शासकीय महापूजा आणि शिवा संघटनेचा 28 वा राज्यव्यापी मेळावा उत्साहात संपन्न
बीड प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी शिवा संघटनेच्या वतीने तीर्थक्षेत्र कपिलधार सह डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्या भक्ती स्थळाच्या विकासाला भरघोस निधी देण्यासंदर्भात त्यांच्या वतीने मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले आहे. आता या मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मी स्वतः आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आम्ही दोघेजण मिळून मुख्यमंत्री आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घालून या विकास कामांना येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजुरी देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करूत.शिवा संघटने समवेत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली बैठकीचे आयोजन केले जाईल अशी जाहीर ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्याच्या व्यासपीठावरून दिली.
बीड पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र कपिलधार येथील पवित्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊली यांच्या संजीवन समाधी स्थळाची 22 वी शासकीय महापूजा कार्तिक पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी शासकीय महापूजेला शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर, माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे,माहिती अधिकारी अंजू निमसरकर यासह राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, विरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज, प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज, शिवयोगी शिवाचार्य मैशाळकर महाराज, शिवानंद तमलुरकर महाराज, प्रभूदेव शिवाचार्य शिरडशहापूरकर महाराज,हरेश्वर शिवाचार्य गडगेकर महाराज, शांतलिंगेश्वर शिवाचार्य तोलनूरकर महाराज, आचार्य गुरुराज स्वामी, राचलिंग महाराज माहूर आदी शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय महापूजा नंतर कपिलधार ट्रस्टच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर अखिल भारतीय शिवा संघटनेचा 28 वा राज्यव्यापी मेळावा कपिलधारच्या शिवा मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे मागील 28 वर्षापासून एक तिथी,एक मैदान, एक नेता आणि शिवा संघटनेची धगधगती विचारधारा होय. शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे बीड लोकसभा प्रमुख श्री पाटील, माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे,अँड. चंद्रकांत नवले तसेच शिवा संघटनेचे सर्वश्री उमाकांत शेट्टे पुणे राष्ट्रीय सरचिटणीस,डॅा वाय बी सोनटक्के मुंबई राष्ट्रीय उप्पाध्यक्ष,अभयराव कल्लावार नागपुर राष्ट्रीय उपाध्यक्ष,धन्यकुमार शिवणकर परभणी राज्य सरचिटणीस,वैजनाथ तोनसुरे नांदेड राज्य उपाध्यक्ष,रुपेश होनराव डोंबिवली राज्य उपाध्यक्ष,सुनिल वाडकर नाशिक राज्य उपाध्यक्ष,मनिष पंधाडे बुलढाणा राज्य अध्यक्ष शिवा सोशल मिडीया,दत्ता खंकरे लातुर राज्य सरचिटणीस,सांतलिंग स्वामी धाराशिव राज्य चिटणीस, विठ्ठलराव ताकबीडे नांदेड राज्य सरचिटणीस शिवा कमचारी महासंघ,नारायण कंकनवाडी पनवेल मुख्य संघटक,संजय कोठाळे नांदेड मराठवाडा प्रमुख शिवा कमचारी महासंघ,अरविंद भडोळे पाटील सोलापुर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शिवा संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. याप्रसंगी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की,तीर्थक्षेत्र कपिलधारला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न मी जवळून पाहिलेले आहेत. समाजासाठी झटणारा असा नेता येणाऱ्या 2024 मधील निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या वरच्या किंवा खालच्या सभागृहात तरी दिसला पाहिजे. त्यांच्यासोबत माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांच्यासारखे हुशार व्यक्तिमत्व सुद्धा राज्याच्या सभागृहात असायला हवे असे मत व्यक्त करून मी तीर्थक्षेत्र कपिलधारच्या मंजूर आराखड्यानुसार जो विकास निधी अद्याप मिळालेला नाही तो सर्व निधी किंबहुना त्यापेक्षा जास्तीचा निधी कपिलधारच्या विकासासाठी देण्याचा प्रयत्न करेल तसेच राष्ट्रीय संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांच्या भक्ती स्थळा साठी 25 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यासाठी मी आणि मंत्री दीपक केसरकर साहेब दोघेजण मिळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना साकडे घालून हा विकास निधी आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी दिली. माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांनी शिवा संघटनेचे संस्थापक प्राध्यापक मनोहर धोंडे सर आता आमदार झाले पाहिजेत असे मत व्यक्त करून कपिलधारच्या विकासासाठी मी सदैव सरांच्या सोबत आहे अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले, यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे तीर्थक्षेत्र कपिलधारच्या शासकीय महापूजेला येणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना येता आले नाही. पुढच्या वर्षी साहेब मुख्यमंत्री म्हणूनच शासकीय महापूजेला येतील असे साकडे मी संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीला घातले आहे असे मत व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकात आणि प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर 28 व्या राज्यव्यापी मेळाव्याला रात्री सव्वा अकरा वाजेपर्यंत विचारांची शिदोरी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी आपल्या अविरत मार्गदर्शनातून दिली. ते म्हणाले 1996 साली ज्यावेळी शिवा संघटनेचा पहिला राज्य मेळावा झाला त्यावेळी फक्त पाचशे लोक या ठिकाणी होते. मागील 28 वर्षात कपिलधारला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला.कपिलधारला शासकीय महापूजेचा मान दिला. 100 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली.त्यापैकी 11 कोटी 26 लाख रुपयेचा निधी विविध विकास कामांसाठी आला. त्याचबरोबर आजपर्यंत शिवा संघटनेच्या प्रयत्नामुळे कपिलधारच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. यापुढे देखील कपिलधार च्या सर्वांगीण विकासासाठी शिवा संघटना कटिबद्ध आहे.महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तीर्थक्षेत्र कपिलधार च्या विकासासह राष्ट्रीय संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांच्या भक्तीस्थळाच्या विकासाचे पालकत्व देखील स्वीकारावे आणि आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वतीने भक्तिसळाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी द्यावी अशी जाहीर मागणी करून त्यांनी आता यापुढे शिवा संघटना ही वीरशैव लिंगायत समाजासाठी झटणारी सामाजिक संघटना होती आणि कायम राहील अशी ग्वाही देत भविष्यामध्ये शिवा संघटने सोबतच आता राजकीय स्वतंत्र वाटचाल करण्यातचे जाहीर केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट
लोकसभा विधानसभेसह सर्व
निवडणुका आता लढवणार प्रा. मनोहर धोंडे
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवा संघटना मागील 28 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. या सामाजिक कार्याला राजकीय पाठबळ आवश्यक आहे. राज सत्ते शिवाय समाजाचा विकास होणार नाही ही कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन मी आज शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यातून जाहीर घोषणा करत आहे की, यापुढे आता सेवा जनशक्ती पार्टी या नावाने मी राजकीय पक्षाची घोषणा करत आहे. सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून येणारी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक जो कोणी आम्हाला योग्य वाटा देण्याचा निर्णय घेईल त्या समविचारी पक्षांसमवेत आम्ही आघाडी किंवा युती करण्यास तयार आहोत. विचार आणि निष्ठा आम्ही कायम जपली आणि भविष्यातही राजकीय वाटचालीत जोपासू अशी ग्वाही दिली.येणाऱ्या लोकसभा, विधानसभा सोबतच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सेवा जनशक्ती पार्टी सक्रियपणे राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे जाहीर प्रा. मनोहर धोंडे यांनी केले.
चौकट
या मान्यवरांना शिवा
राज्यस्तरीय पुरस्काराने केले सन्मानित
युवा संत म्हणून चौदाव्या वर्षी पाच भाषेतून धार्मिक ज्ञान घेणारे राष्ट्रीय संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तरदायित्व स्वीकारलेले गुरुवर्य राजशेखर अहमदपूरकर महाराज यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारानंतर शिवा संघटनेचे विविध राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले. यामध्ये मंत्री महोदयांच्या शुभहस्ते उत्कृष्ट शासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई येथील संचालक डॉक्टर वाय बी सोनटक्के यांना, तर उत्कृष्ट शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून मुख्यमंत्री विशेष कार्य अधिकारी मुंबई असलेले मंगेश चिवटे, उत्कृष्ट भाषण आणि इष्ट लिंगधारी गणेश उत्सव पुरस्काराचे मानकरी ठरल्या सौ सुजाता शिवानंद पाटील, सोलापूर आणि सौ सुजाता भीमाशंकर वारड, रायगड यांना मंत्री महोदयांसह मान्यवरांच्या शुभहस्ते शिवा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment