श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला निधी कमी पडू देणार नाही : भागवत कराड



 शेवगांव (अविनाश देशमुख 9960051755) श्रीरामपूर ( बेलापूर ) परळी या रेल्वे मार्गासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नामदार भागवत कराड यांनी नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना दिले रेल्वे प्रवासी प्रकोष्ट महाराष्ट्र भाजपा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा रेल्वे परिषद भरवण्यात आली होती या परिषदेसाठी भागवत कराड भाजपचे महामंत्री संजय केनेकर उपस्थित होते महाराष्ट्रातील अन्य भागातून मराठवाड्यात येणाऱ्या रेल्वे मार्गासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेसाठी नांदेड लातूर परभणी परळी इत्यादी भागातील रेल्वे मार्गासाठी झटणारे पदाधिकारी व जनता उपस्थित होती या परिषदेसाठी नेवासा तालुक्यातून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गासाठी एक शिष्ट मंडळ नेले होते आमदार मुरकुटे यांनी श्रीरामपूर परळी रेल्वे मार्ग संदर्भात संपूर्ण माहिती मंत्री कराड यांना दिली यावर कराड यांनी आमदार मुरकुटे यांना निधीची काळजी करू नका श्रीरामपूर परळी साठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले यावेळी बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी आप्पासाहेब कावरे अण्णासाहेब गव्हाणे राजेंद्र कीर्तने आदी उपस्थित होते येणाऱ्या केंद्रीयअर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन भरघोस निधी द्यावा व तातडीने या रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे

विशेष बाब

 रेल्वेचा शिक्का असलेल्या उताऱ्यांवर सध्या अनेकांनी शेती सुरू केली आहे बंगले बांधले आहेत फॅक्टरी सुरू केले आहेत भारतीय रेल्वे असा शिक्का असलेल्या उतारांवर खरेदी-विक्री होतीच कशी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे



1922 मध्ये श्रीरामपूर परळी रेल्वे चा सर्वे झाला होता यामध्ये श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई माजलगाव आधी तालुक्यांमध्ये रेल्वे भराव सुद्धा त्यावेळी टाकला होता परंतु राजकीय आणि इच्छा आणि उत्तरेतील नेत्यांची दादागिरी यामुळे संबंधित प्रकल्प शंभर वर्षात पूर्ण होऊ शकला नाही आता निश्चितच या प्रश्नाला वाचा फुटेल अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी