ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतले श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे दर्शन
.बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर:- वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्यात आज दुपारी तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली.याच दरम्यान संत वामनभाऊ च्या समाधीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतल्यानंतर ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी गडाच्या वतीने स्नेह भोजनही स्वीकारले अचानक झालेल्या या प्रदीर्घ भेटीची चर्चा मात्र यावेळी या परिसरात चर्चाचा विषय ठरली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर संघर्ष करणारे ॲड बाळासाहेब आंबेडकर आज दुपारी निवांत दिसलें त्यांनी अचानक बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर दुपारच्या वेळी महंत विठ्ठल महाराज यांच्याशी बंद दाराआड मुक्त संवाद साधला दरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली या संदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी राजकीय सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले एक वर्षावर लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत राजकीय नेते राज्यभराच्या वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांशी चर्चा आणि संवाद साधत आहेत आज गुरुवारी दुपारी बाळासाहेब आंबेडकर यांनी अचानक संत वामनभाऊ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित हा गड राज्य आणि देशभराच्या धार्मिक नकाशावर आले आहे लाखो भाविक भक्त येथे पुण्यतिथीला येतात हि पुण्यतिथी जानेवारी महिन्यात असल्याने बाळासाहेब आंबेडकर यांना गडाच्यावतीने आमंत्रणही दिले जाऊ शकते अशी चर्चा यावेळी दिसुन आली एकूणच बाळासाहेब आंबेडकर आणि महंत विठ्ठल महाराज यांच्यामध्ये तब्बल दोन तासाहुन अधिक बंद घरात चर्चा मध्ये कोणते विषय हाताळले गेले यासंदर्भात तालुका आणि जिल्हा भर चर्चेला उधाण आले आहे यावेळी त्यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण सर. तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष प्रा विष्णू जाधव सर जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सचिन मेघडबर शामसुंदर वाघमारे सुभाष सोनवणे राहुल सोनवणे विविध पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment