कुणबी नोंदी पहाण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पाटोदा तहसील कार्यालयात मिळते हीन वागणूक
कुणबी नोंदी पहाण्यासाठी गेलेल्या नागरिका कडुन पैशाची मागणी होत असल्यामुळे पाटोदा तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावात - आण्णा जाधव
पाटोदा (प्रतिनिधी) राज्यात आरक्षणाचा विषय गाजत आसुन राज्यात कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे मराठा समाजातील नागरिक कुणबी नोंदी पहाण्यासाठी शासकीय कार्यालयात सर्वत्र जातात आशेच पाटोदा तहसिल कार्यालयात ही कुणबी नोंदी पहाण्यासाठी मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने जातात यांचाच गैरफायदा पाटोदा तहसील कार्यालयातील कर्मचारी घेत आहेत.पाटोदा तहसील कार्यालयात कुणबी नोंदी पहाण्यासाठी गेलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना पाटोदा तहसील कार्यालयातील अभिलेख विभागातील कर्मचारी हीन वागणूक देत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ह्या गंभीर घेटनेची तात्काळ दखल घेऊन चौकशी करून कारवाई करावी तसेच अभिलेख विभागात तोंड पाहून कारभार होत आहे तसेच जो पैसे देईल त्याचे काम लवकर होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी पाटोदा तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा जाधव यांनी केली आहे
Comments
Post a Comment