परळी शहरातील भीमनगर व साठे नगर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी 1 डिसेंबर पासून सर्वपक्षीय कार्यकर्ते उपोषणास बसणार


                                          परळी प्रतिनिधी--परळी शहरातील भीमनगर व साठे नगर येथील अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी या भागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते 01 डिसेंबर 2023 पासून परळी पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर व साठे नगर येथील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत यासाठी लेखी निवेदन परळी पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन, दि. 14 /10/ 2023 रोजी दिले असता कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्याच्या कारणाने परत दिनांक 2/ 11/ 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांना प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदन देऊनही आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे सदरील अवैद्य धंदे, हातभट्टी दारू विक्री सर्रास परे चालू असून या धंद्यामुळे गोरगरिबाचे संसार उध्वस्त होऊन वाटोळे होत आहे तर दारूच्या आहारी जाऊन युवकांचे जीवन बरबाद होत असल्याकारणाने सदरील अवैद्य धंदे करणारा वर एम.पी.डी.अंतर्गत गुन्हे दाखल करून सदरील विभागातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी लेखी मागणी देऊनही कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आम्ही खालील सर्वजण वैजनाथ तात्या जगतकर माजी नगराध्यक्ष नगरपरिषद परळी वैजनाथ अनिल मस्के गुत्तेदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते सोपानराव ताटे, नगरसेवक नितीन रोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर, राष्ट्रवादीचे भैय्यासाहेब आदोडे, धम्मा अवचारे, संतोष आदोडे,राघू ताटे, अंबादास रोडे शुद्धधन साळवे, जतीन जगतकर, सुनील हनवते,पी. पी.Exact, वसंत बनसोडे, अशोक जगतकर यांच्यासह महिला ही उपोषणास बसणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी