देऊळगाव घाट येथील अखंड हरिनाम सप्ताह /महा ज्ञान यज्ञ सोहळ्यास प्रारंभ


तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा -सप्ताह कमिटी
आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) : 
  आष्टी तालुक्यातील मौजे देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथे, २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर रोजी, भैरवनाथ जयंती निमित्त अखंड ज्ञानेश्वरी पारायण महा ज्ञान यज्ञ सोहळ्यास प्रारंभ होत असून हा महा ज्ञान यज्ञ सोहळा, भागवत महाराज उंबरेकर यांच्या कृपा आशीर्वाद खाली चालू असून या सप्ताहाचे हे ३५ वे वर्ष आहे . या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत .
 या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये ७ दिवस चूल पेटवली जात नाही , या सप्ताहामध्ये मगर महाराज, राऊत महाराज, सातपुते महाराज, कुऱ्हे महाराज ,आठरे महाराज, मोरे महाराज, व भागवत महाराज उंबरेकर, यांचे कीर्तन होणार आहेत .
   या ज्ञान यज्ञ महा सप्ताहाचे पारायणाचे नेतृत्व गोवर्धन महाराज ठोंबरे हे करणार असून, काल्याचे किर्तन भागवत महाराज उंबरेकर यांचे होणार आहे , या सप्ताहाच्या महाप्रसादाचे अन्नदाते, इयत्ता दहावी सन २००६ ची बॅच ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट, या मुला मार्फत असून ,भैरवनाथ जयंती निमित्त देऊळगाव घाट चे काही भाविक भक्त काशी वरून गंगाजल आणण्यासाठी गेले आहेत .
    तरी आष्टी तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा / महा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देऊळगाव घाट सप्ताह कमिटीने केले आहे .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी