शासनाने खुंटेफळ साठवन तलाव मंजूर नसताना ? आधी खरेदी घेतलेल्या शेतकर्यांच्या जमिनी परत कराव्यात ?
  अथवा फेरमुल्यांकन करुन न्याय द्यावा ---संभाजीनगर येथे चिफ ईंजिनियर यांच्याकडे प्रदिप थोरवे(आप नेता) यांची मागणी --
आष्टी  ( प़तिनिधी  --गोरख मोरे  ) : 
  छत्रपती संभाजीनगर येथे मा.कार्यकारी संचालक ,
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ संभाजीनगर  , व विभागीय आयुक्तांची भेट घेवुन बीड जिल्ह्यतील विविध प्रकल्पांबाबत आम आदमी पार्टीचे  युवक  नेते प्रदिप थोरवे यांनी माहीती घेतली व खुंटेफळ साठवन तलावासारख्या प्रकल्पासाठी शासनानने अत्यल्प दरात खरेदी केलेल्या शेतकंर्याच्या जमीनीचे फेरमुल्यांकन करन्यासंबंधी विभागीय अधिकार्याना निवेदन देवुन विनंती केली , शासनाने त्यावेळी जमीनी खरेदी घेताना भुमी अधिग्रहण कायद्यातील तरतुदीचा अवलंब केलेला नाही ? तरी प्रचलित सन २०१३ चे शासन निर्णयाप्रमाणे शेतकर्यांना त्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा सुधारीत पध्दतीने फेर मुल्यांकन करून फरक असलेला मावेजा मिळावा ?  नसता भूमी अधिग्रहण कायदयातील तरतुदीनुसार प्रकल्प विहीत मुदतीत पुर्ण न झाल्यामुळे त्यांच्या जमीनी नियमानुसार परत करण्यात याव्यात ? ज्या शेतकर्यांनी साठवण तलावासाठी २०१३ पुर्वी शासनास जमीनी देऊन मोलाचे योगदान दिलेले आहे , त्यांची जमिन शासनाने अत्यल्प दराने घेतली आहे ? व सध्या राहीलेल्या शेतकर्यांची जमीन बाजार भावापेक्षा चार ते पाच पट कीमतीने खाजकी वाटाघाटीतुन घेन्यात येत आहे ?म्हनुन शासनाने आधीच्या शेतकर्यांना सानुग्रह अनुदान तथा / भावनीक रक्कम फरक म्हनुन २८ लाख रु प्रती हेक्टरी देन्यात यावी , याबाबद आपन स्थानीक अधीकार्यांना अहवाल मागु व त्यांची मागणी योग्य वाटल्यास आपन शेतकर्यांना पैसे देऊ , असे आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे  ,विकास महामंडळाच्या अधीकार्यानकडुन देन्यात आले आहे  ,
अशी माहिती आप युवक नेते प्रदिप थोरवे यांनी  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे  .
Comments
Post a Comment