महानगरपालिकेच्या भूखंडावर बांधलेल्या भिंतींना लोखंडी दरवाजे बसवावेत -आम आदमी पार्टीची मागणी


आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मध्ये बडी दर्गा शरीफ येथे पाण्याच्या टाकीजवळ मनपाचा भूखंड असून येथे मनपाने सदर भूखंडाला तटस्थ भिंत बांधून दिलेली आहे परंतु या भूखंडात आजूबाजूचे रहिवाशी सतत कचरा टाकत असतात त्यामुळे समोर असलेल्या सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद सादिक शाह हुसेन यांची दर्गा आहे जिथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात तसेच सदर मनपाच्या भूखंडाला लागून मनपाची शाळा देखील आहे सदर भूखंडावर नेहमी दुर्गंध पसरलेला असतो, त्यामुळे मच्छर व माशांचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे.

महानगरपालिकेच्या नाशिक मधील सर्वच भूखंडावर नुसत्या भिंती बांधल्या आहेत, परंतु त्यांना लोखंडी दरवाजे नसल्यामुळे नशा करणारे लोक, गार्डनमध्ये जावून नशा करीत असतात आणि सर्वत्र घाण पसरवीत असतात, या विषयी अनेक वेळा महानगरपलिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देवूनही तेथील भूखंडाची साफसफाई झालेली नाही, तसेच सदर भिंतींना लोखंडी दरवाजे बसून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली होती आणि आजही ती पूर्ण झालेली नाही.

आज पुन्हा महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांना स्मरणपत्र देवून मागणी करण्यात आली आहे, सदर भूखंड आठ दिवसाच्या आत स्वच्छ करून लोखंडी दरवाजे बसविण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात येईल व त्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची असेल असे आप नाशिकने म्हटले आहे.

ह्या वेळी राज्य संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मिडिया प्रमूख चंदन पवार, मा. आंदोलन प्रमुख माजिद पठान, अमर गांगुर्डे ईत्यादी उपस्थित होते.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी