लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी दलित नगरसेवक आक्रमक

राखीव प्रभागाचा विकास हेच ध्येय

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी दलित नगरसेवक आक्रमक
बीड (प्रतिनिधी) 28 नोव्हेंबर 
अनु.जातीच्या लोकसंख्येनुसार राखीव प्रभागात मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये रस्ते,नाल्या वा इतर नागरी सुविधा पुरविणे साठी तसेच विकास कामे करण्यासाठी राज्य शासन नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शहरी भागासाठी नगर परिषदेला निधी उपलब्ध करून दिला जातो
तशी तरतूद संविधानाचे शिल्पकार तमाम भारतीयांचे उद्धारकर्ते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या घटकपर्यंत विकासाच्या दृष्टीने संविधानात केली असून आंबेडकरांचे हे उपकार कधी न फिटणारे आहेत 
परंतु आज ही प्रशासकीय स्तरावर मागासवर्गीयांच्या वस्त्या विकासापासून कोसो दूर ठेवण्याचं कारस्थान केले जात आहे 
 सन 2023-24 या वर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत निधी उपलब्ध झाले बाबत मा. मुख्याधिकारी, नगर परिषद बीड यांना जिल्हा प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले असून देखील
पत्राच्या अनुषंगाने अद्याप पर्यंत मुख्याधिकारी,बीड तसेच नगरपरिषद प्रशासनाने प्रस्ताव पाठवणे संदर्भात कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने अनुसूचित जाती, मागासवर्गीय माता.भगिनीं, बांधवांवर एक प्रकारे अन्याय केला जात असून मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये विकास कामे करण्यासंदर्भात नगर परिषद प्रशासन उदासीन असल्याचे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवते
 जिल्हाधिकारी बीड यांनी 30-10-2023 रोजी पत्रान्वय 30 -11-2023 पर्यंत प्रस्ताव सादर करणे असे सूचित केले असतांना ही नगर परिषद बीड यांनी आज दिनांक 28-11-2023 पर्यंत प्रस्ताव दाखल केला नाही ही अतिशय चिंताजनक,खेदजनक, गंभीर बाब असून मागासवर्गीयांच्या वस्त्या व निधीबाबत प्रशासन जातीय द्वेषी भूमिका घेत असल्याची धारणा समाजा मध्ये निर्माण होत आहे
जर ,प्राप्त निधी लोप पावला,अथवा परत गेला तर मागासवर्गीयांच्या वस्त्या विकासापासून वंचित राहतील यास सर्वस्वी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड व प्रशासन जबाबदार राहील
मुदतपूर्व तात्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावित विकास कामांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवुन,राखीव प्रभागात विकास कामे करा नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंधारे यांना दिलेल्या निवेदनातून माजी नगरसेवक भिमराव वाघचौरे, विष्णू वाघमारे, अँड विकास जोगदंड,पुजा वाघमारे,सीताबाई मोरे,मीनाताई लांडगे 
सह आदींनी दिला आहे या प्रसंगी
 भैय्या मोरे,बिभीषण लांडगे, सनी भैय्या वाघमारे,मंगेश जोगदंड, महादेव वंजारे सह आदी उपस्थित होते 
राखीव प्रभागाचा संपूर्ण विकास हेच आमचे ध्येय असून प्रशासनाच्या विरोधात दलित नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी