भारतातील विविधता एका सूत्रात बांधणारा गुरुमंत्र म्हणजे भारतीय संविधान - भाई गौतम आगळे
परळी (प्रतिनिधी ) भारतातील विविधता अनेक भाषा संस्कृती, धर्म, जात,पंथ,वंश, वेगवेगळ्या चालीरीती, रुढी, परंपरा या सर्वांना एका सूत्रात बांधणारा गुरु मंत्र म्हणजे भारतीय संविधान आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर येथे आयोजित भारतीय संविधानाचा ७४ वा संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.
भाई आगळे सर पुढे म्हणाले की सध्याचे केंद्रशासन संविधानाच्या विरुद्ध रोज कृत्य करत आहे संविधानात स्वातंत्र्य समता आणि बंधूत भाव या तीन तत्त्वाच्या आधारावर भारत पुनश्चा निर्माण करण्याचे साधन आहे. परंतु आर.एस.एस. व केंद्रशासन येणाऱ्या लोकसभेत पुन्हा निवडून आले तर ते संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत. जमलेल्या सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जर संविधान बदलण्याची वेळ आली तर त्यांनी आपापल्या पक्षश्रेष्ठीला संविधान वाचवण्याची भूमिका घेण्यासाठी भाग पाडावे व संविधान वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्या बाजूने उभे रहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षाचे नेते संघटनांचे पदाधिकारी आदींचा बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने फेटे बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यानंतर भारतीय संविधानाबद्दल संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेचे नेते पीएस घाडगे गुरूजी,संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सय्यद चाऊस, प्रा. दासू वाघमारे,परळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळुंके, चर्मकार महासंघाचे रोहिदास बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार राणबा गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अँड.जीवनराव देशमुख,मा. नगरसेवक प्रा. पवन मुंडे मोमेंट फार पीस अँड जस्टीस संघटनेचे सय्यद सभा आली, शिवसेनेचे नेते अभय उर्फ पप्पू ठक्कर , लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे के.डी.उपाडे, बसपाचे डॉक्टर अनंत गायकवाड, मराठा सेवा संघाचे प्रा. एम. एल. देशमुख, काँग्रेसचे दीपक शिरसाठ,वकील संघाचे अध्यक्ष पी.सी.गिराम आदींनी भारतीय संविधानावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी कवी मुक्तार पानगावकर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देणारी कविता सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव रोडे होते. प्रास्ताविक प्रा.विलास रोडे यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन सामाजिक युवक नेते आनंत इंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन वैजनाथ जगतकर यांनी मानले,कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.
Comments
Post a Comment