चौसाळा महावितरणचा भोगंळ कारभार थांबवा अन्यथा अधिकारयाच्या तोडांला काळे फासणार-विवेक कुचेकर

चौसाळा परिसरात अपघाताला निमंत्रण,सर्वच रोहित्रांच्या पेट्या उघड्या, वेलींसह झाडा-झुडपांचा वेढा


(चौसाळा प्रतिनिधी) चौसाळा महावितरण कार्यालयाअंतर्गत चौसाळा, हिंगणी (बु), हिंगणी (खुर्द), जेबापिंप्री, पालसिंगण, चांदेगाव, देवीबाभूळगाव, अंजनवती, घारगाव, माळेवाडी, रुईगव्हन, पिंपळगाव, वाढवणा, मानेवाडी, सुलतानपूर, कानडी, गोलंग्री, लोणी घाट आदी सर्वच गावांतील डीपी (रोहित्र) पेट्या गेल्या अनेक वर्षांपासून उघड्या असून, याकडे महावितरणचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे. 
अनेक रोहित्रांच्या (डीपी) बॉक्सची झाकणे तुटलेली आहेत, त्यातील बाहेर डोकावणारे वायरिंग, लोंबणाऱ्या वायरी, कित्येक डीपींची झाकणेही उघडीच, काही डीपी तर विजेच्या खांबावरून निखळून खाली जमिनीलगतच आलेल्या आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी वापर असणाऱ्या या रोहित्रांच्या मेंटेनन्सचा म्हणजेच फ्यूज, रोहित्रातील तेल, त्याचे झाकण आदींचा आर्थिक खर्च शेतकरी वर्गणी करून करत आहेत. तसेच अनेक गावांतील लोंबकळणाऱ्या तारा ह्या जीवघेण्या ठरत आहेत. या तारांचे घर्षण होऊन अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. किमान आता तरी जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता वरील सर्व बाबींची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे असुन 
रोहित्रांच्या उघड्या असलेल्या पेट्यांमुळे यापूर्वीही अनेकांचे जीव गेलेले आहेत. आणखी किती जीव जाण्याची वाट महावितरण बघत आहे? महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन दुरुस्तीच्या कामास सुरवात करावी अन्यथा महावितरणच्या अधिकारयाच्या तोडांला काळे फासण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी